Ad will apear here
Next
नाथगीता (अध्याय १ ते १८)
श्रीमद्भगवद्गीता हा भारतीयांचा महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. तिच्या वाचनातून अंतिम सत्याचे दर्शन घडण्यास मदत होते. व्यवहार व परमार्थ एकत्र साधला जातो. यामुळे आध्यात्मिक गोंधळ बाजूला सारता येतो आदी मुद्दे स्पष्ट करीत त्यांचे विवेचन व गीतेचे हे वेगळेपण डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथगीता’मधून दाखवून दिले आहे. जीवाला त्याचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी गीता मदत करू शकते, असे यात म्हटले आहे.

पंचेद्रिये (पांडव), शेकडो आसक्ती (कौरव), अनियंत्रित विचार (दोन्ही बाजूचे सैन्य), संभ्रमित मन (अर्जुन) व आत्मज्ञान, अशी रचना देहाची असते. त्यांच्या सततच्या महायुद्धातून विवेकाने विजय मिळवीत परमप्रकाशात विलीन होण्याची क्रिया म्हणजे गीता, या अर्थाने या पुस्तकात महाभारताची प्रतीकात्मक कथा असून, हे रूपक उलगडून दाखविले आहे. दशानन, मोक्ष, संन्यास, यज्ञ यांसारख्या अनेक संकल्पना लेखिकेने समजावून सांगितल्या आहेत. चुकीच्या पारंपारिक मतांचे खंडन करीत योग्य विचार करण्याची दिशा यातून दाखविली आहे.

पुस्तक : नाथगीता (अध्याय १ ते १८)
लेखक : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशक : आरंभ प्रकाशन
पाने : ६१०
किंमत : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPBBY
Similar Posts
नाथ भागवत महाभारत आणि श्रीमद्भागवत या दोन्हींचे रचनाकार व्यास मुनी आहेत. महाभारतात युद्धाचे, भागवतात भक्ती आणि शांत रसाचे वर्णन आहे. यातील कथेत माणूस रमतो, पण चमत्कारात न गुंतता त्याचे सार काय आहे समजून घेणे आवश्यक आहे, असा विचार मांडत डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ-भागवत’मधून त्यातील सारसंग्रह वाचकांपुढे ठेवला आहे
नाथ- अष्टांगयोग पातंजल योगसूत्र म्हणजेच अष्टांग योग. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही महत्त्वाची आठ अंग आहेत. त्यांची सत्य, अहिंसा, अस्तेय अशी बरीच उपांग आहेत. या सर्वांचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ- अष्टांगयोग’मधून केले आहे.
अष्टावक्र-नाथगीता ‘अष्टावक्र-नाथगीता’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language