Ad will apear here
Next
वैद्य पाटणकर दांपत्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
पुणे : येथील आरोग्यवर्धिनी चिकित्सालयाचे वैद्य डॉ. हरीश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर या दाम्पत्याची आठव्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी निवड झाली आहे. अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॉन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या परिषदेत डॉ. पाटणकर दाम्पत्य ‘केस विकारांच्या निदानासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग व वापर’ या विषयावर प्रबंध सादर करणार आहेत. केशायुर्वेद या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब व संशोधन केंद्रामार्फत डॉ. हरीश व डॉ. स्नेहल यांनी संशोधन केले आहे.
 
गुजरात सरकारचे आयुष मंत्रालय आणि वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत जगभरातून पाच हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. तीस सत्रांत १५० पेक्षा अधिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. स्नेहल पाटणकरवैद्य डॉ. हरीश पाटणकर‘बदलत्या काळात केसांना लावण्यासाठी बाजारपेठांमध्ये हजारो उपलब्ध उत्पादने येत आहेत; परंतु आपल्या केसांसाठी कोणते तेल पोषक आहे, हा प्रश्न सामान्य जनतेला नेहमीच पडलेला असतो. नव्या पिढीला आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, तसेच आयुर्वेदिक पद्धतीने आधुनिक उपचारांद्वारे केसांच्या समस्या दूर करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल,’ असा विश्वास डॉ. पाटणकर दाम्पत्याने व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZRSBV
Similar Posts
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद नेदरलँडमध्ये पुणे : ‘जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद डेनहॅगमधील गांधी सेंटर (इंडियन
‘संशोधनाने आयुर्वेदावरील लोकांचा विश्वास वाढेल’ पुणे : ‘आयुर्वेद शास्त्राबद्दल लोकांच्या मनात विश्वास आणि अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांनी यामध्ये संशोधन करण्यावर भर द्यावा. संशोधन ठरवून होत नाही, तर ते मानसिकतेत असावे लागते. आयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील,’असे प्रतिपादन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ
केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा पुणे : ‘भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी दुपारी तीन
‘आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे’ पुणे : ‘शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना भेटलो आहे. त्यातील अनेकांच्या उपचाराच्या पद्धती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन झाले, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language