Ad will apear here
Next
मनोहर श्याम जोशी, रॉबर्ट शॉ
...‘भारतीय दूरदर्शन सोप ओपेराचे जनक’ असं ज्यांना आदराने म्हटलं जातं, ते मनोहर श्याम जोशी आणि शेक्सपीरियन रंगभूमी व हॉलिवूडचे सिनेमे गाजवणारा अभिनेता रॉबर्ट शॉ यांचा नऊ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
मनोहर श्याम जोशी

नऊ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेरमध्ये जन्मलेले मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार! त्यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, ‘काकाजी कहीन’, ‘हमराही’, ‘जमीन आसमान’, ‘गाथा’ यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची ‘कसप’ ही कादंबरी तर हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम प्रेमकथांमध्ये अग्रेसर मानली जाते. त्यांनी हे राम, अप्पू राजा, पापा कहते है आणि भ्रष्टाचार यांसारख्या सिनेमांसाठी पटकथा-संवादही लिहिले आहेत. ३० मार्च २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
........
...रॉबर्ट शॉ

नऊ ऑगस्ट १९२७ रोजी लॅन्कशरमध्ये जन्मलेला रॉबर्ट शॉ हा शेक्सपीरियन रंगभूमी आणि हॉलिवूडचे सिनेमे गाजवलेला हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमध्ये असताना मॅक्बेथ, सिम्बेलीन, हेन्री दी एट्थ यांसारखी नाटकं करता करता त्याने अमेरिकेत गेल्यावर हॅरोल्ड पिंटरच्या ‘दी केअरटेकर’मध्ये काम केलं होतं. त्याची सिनेमातली पहिली लक्षात राहणारी भूमिका होती शॉन कॉनरीच्या जेम्स बाँड सिनेमातली ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’मधली. पुढे त्याचे - दी लक ऑफ जिंजर कॉफी, बॅटल ऑफ दी बल्ज, ए मॅन फॉर ऑल सीझन्स, दी स्टिंग, जॉज, रॉबिन अँड  मरियन, ब्लॅक संडे, फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन, दी रॉयल हंट ऑफ दी सन - असे सिनेमे गाजले आहेत. २८ ऑगस्ट १९७८ रोजी त्याचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला. 
.........
यांचाही आज जन्मदिन :
प्रेमाविषयी अत्यंत हृदयंगम, आर्त भावना व्यक्त करणारे कवी कृ. ब. निकुंब (जन्म : नऊ ऑगस्ट १९२०, मृत्यू : २० जून १९९९)
‘मेरी पॉप्पिन्स’ या अद्भुत दाईची व्यक्तिरेखा निर्माण करणारी लेखिका पी. एल. ट्रॅव्हर्स (जन्म : नऊ ऑगस्ट १८९९, मृत्यू : २३ एप्रिल १९९६) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
कॅप्टन मार्व्हल आणी डेंकालीच्या महाबली वेताळाची (फँटम) भूमिका पडद्यावर अजरामर करणारा अभिनेता टॉम टायलर (जन्म : नऊ ऑगस्ट १९०३, मृत्यू : ३ मे १९५४) 
अफाट लोकप्रिय गायिका, अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन (जन्म : नऊ ऑगस्ट १९६३, मृत्यू : ११ फेब्रुवारी २०१२) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUNBR
Similar Posts
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक अत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिक, ‘पिंक पँथर’ सीरिजमुळे गाजलेला दिग्दर्शक ब्लेक एडवर्डस्, अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री हेलन मीरेन आणि संवेदनशील अभिनेत्री व निर्माती सँड्रा बुलक यांचा २६ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय
विक्रम साराभाई, सेसिल डमिल भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
शकील बदायुनी उर्दू भाषेतले मातब्बर शायर आणि गीतकार शकील बदायुनी यांचा तीन ऑगस्ट हा जन्मदिन.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language