Ad will apear here
Next
पुण्यातील डॉ. सुमित शाह यांना राष्ट्रीय पुरस्कार
डॉ. सुमित शाह यांना आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व डॉ. जे. के. सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे : पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमित शाह यांना ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑफ द इयर-२०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या ‘ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स अॅवॉर्डस् अँड समिट’ या कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व पद्मश्री डॉ. जे. के. सिंग यांच्या हस्ते शाह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. शाह यांना कर्करोग उपचार क्षेत्रातील १२ वर्षांचा अनुभव असून, गेली पाच वर्षे ते पुण्यात कार्यरत आहेत. कर्करोगाविषयी जनजागृती, तसेच तंबाखू व्यसनमुक्तीविषयी व्याख्याने देण्याबरोबरच मागील पाच वर्षांपासून ते तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोफत तपासणी करत आहेत. रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान कमी जखम व्हावी, तसेच जखम लवकर भरून निघावी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दुर्गम भागातील अनेक कर्करोग रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केली आहे. त्यांनी ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर’ हे सर्वसमावेशक कर्करोग रुग्णालय सुरू केले असून, कर्करोगाच्या रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

डॉ. शाह म्हणाले, ‘भारतात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण कर्करोग असून, २०१८ मध्ये भारतातील कर्करुग्णांची संख्या २२ लाख ५० हजार होती. प्रत्येक वर्षी साधारण ११ लाख ५० हजार कर्करोग रुग्णांचे निदान होते, तर सात लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा या आजाराने मृत्यू होतो. कर्करोगाचे कारण प्रामुख्याने तंबाखू असल्याचे आढळते. याशिवाय बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, महिलांमध्ये एचपीव्ही संसर्ग हीदेखील कारणे दिसून येतात. भारतातील बहुतांश रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात किंवा उशीरा समोर येतो ही दु:खद बाब आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.’  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZYSCD
Similar Posts
‘तंबाखूविरोधात विविध स्तरांवर प्रयत्न आवश्यक ’ पुणे : ‘३१ मे हा दर वर्षी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ही ‘टोबॅको अँड लंग हेल्थ’ असून, तंबाखूचा फुप्फुसाच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम अधोरेखित करते. फुप्फुसाला होणाऱ्या कर्करोगांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळेच तंबाखूविरोधात
ब्रिजस्टोन इंडियाच्या सहकार्याने हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळेची उभारणी आळंदी : ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने ब्रिजस्टोन इंडिया, या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने आळंदीजवळ असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळा उभारण्यास सहकार्य केले आहे. ब्रिजस्टोन इंडियाचे संचालक अजय सेवेकरी,
रोबोटिक सर्जरीने मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश पुणे : रोबोटिक सर्जरीच्या मदतीने एका ५५ वर्षीय गृहस्थांच्या मूत्रपिंडात असलेला मोठा ट्यूमर काढण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे या व्यक्तीचे मूत्रपिंड वाचवणे शक्य झाले असून, तीव्र पोटदुखीपासून त्यांची मुक्तता झाली आहे.
तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला पुणे : सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language