Ad will apear here
Next
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार
‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे यांनी एक्झिम बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रस्किन्हा यांच्या हस्ते ‘सीआयआय-एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार स्वीकारला.

पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे यांनी एक्झिम बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रस्किन्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

नेतृत्व, धोरण, भागीदारी, ग्राहक केंद्री प्रक्रिया, कार्यक्षमता, अशा विविध निकषांवर कंपनीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड’ अर्थात ‘केओइएल’ने व्यवसाय वृद्धी, विक्री वाढ आणि खेळत्या भांडवलात घट, तसेच निर्मिती प्रकल्पाच्या आणि यांत्रिक क्षमतेचा योग्य वापर करण्यावर भर देत व्यवसायात प्रगती केली आहे. त्याचवेळी सामाजिक जबाबदारी म्हणून उद्योग समूहाच्या तत्त्वांशी साधर्म्य राखत विविध उपक्रम राबवले आहेत. ज्याचा समाजाला फायदा झाला आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी तिची निवड केल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि एक्स्पोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) यांनी १९९४ पासून संयुक्तपणे व्यावसायिक गुणवत्तेसाठी हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली. भारतीय उद्योग क्षेत्रात एक मानाचा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. युरोपियन फाउंडेशन ऑफ क्वालिटी मॅनेजमेंटच्या धर्तीवर आधारीत अत्यंत कठोर निवड प्रक्रिया या पुरस्कारासाठी अवलंबली जाते.  

आर. आर. देशपांडेया पुरस्काराला उत्तर देताना ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे म्हणाले, ‘‘केओइएल’च्या सन्मानात भर घालणारा हा पुरस्कार आहे. सीआयआय आणि एक्झिम बँकेचा मी आभारी आहे. हा पुरस्कार म्हणजे आमच्या उत्कृष्टतेसाठी असलेल्या कटीबद्धतेला मिळालेली पोचपावती आहे. सतत उत्तमतेचे नवनवीन मापदंड निर्माण करणे हे ‘केओइएल’चे उद्दिष्ट आहे. सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात सर्वोत्कृष्ट उत्पादन निर्माण करणे हे कठीण आहे, पण तीच गुणवत्ता कायम राखणे हे त्याहूनही कठीण आहे. सर्वोत्कृष्टतेच्या या प्रवासात हे मापदंड सातत्याने उंचावत जावेत हाच आमचा अथक प्रयत्न आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPWCG
Similar Posts
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language