Ad will apear here
Next
‘क्रेडाई’कडून केरळला एक कोटी ३५ लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश सुपूर्द करताना क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया. सोबत इतर सदस्य.

पुणे : केरळ पूरग्रस्तांसाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळपणे मदतीचा हात पुढे केला असून, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी ३५ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

नुकत्याच आलेल्या महापुराने केरळचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी जगभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशावेळी केरळमध्ये आलेल्या पूरपरिस्थिचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत केली आहे. या सर्व जमा झालेल्या निधीचा धनादेश क्रेडाई महाराष्ट्रच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष रसिक चौहान, राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे व मनीष कनेरिया उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQGBS
Similar Posts
‘क्रेडाई महाराष्ट्र’ची वार्षिक परिषद नाशिकला पुणे : क्रेडाई महाराष्ट्रातर्फे रात्फे ताफे १३ व १४ जुलै रोजी नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, ही सहावी वार्षिक परिषद आहे. यात महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून एक हजाराहून
‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी राजीव परीख पुणे : ‘क्रेडाई महाराष्ट्र’ची निवडणूक पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे नुकतीच झाली. यात ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सभासदांनी एकमताने परीख यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली. एक एप्रिलपासून त्यांनी पदभार स्वीकारला.
परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी ‘क्रेडाई’ सक्रीय पुणे : प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाच लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील २५ शहरांमध्ये दौरा करणार आहेत
‘परवडणाऱ्या घरांसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रिय’ पुणे : ‘परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाच लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ‘क्रेडाई’ने समोर ठेवले आहे. यापैकी सुमारे तीन लाख २४ हजार ५०० घर बांधणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून, क्रेडाई महाराष्ट्र आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language