Ad will apear here
Next
विवेकानंद महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
कोल्हापूर :  ‘ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याला आज ७० वर्षे झाली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्व युवकांनी राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाजकार्यात उतरले पाहिजे व या देशाला प्रगतीपथाकडे नेले पाहिजे.’ असे विचार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी संस्थेच्या प्राचार्या शुभांगी गावडे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. वाय. होनगेकर उपस्थित होते.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी भाषणातून भारतीय स्वातंत्र्यासंबंधी अनेक ऐतिहासिक प्रसंग कथन केले. ‘अनेक क्रांतिकारकांच्या हौतात्त्म्यावर देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. तसेच या देशातील थोर शास्त्रज्ञ, विचारवंतांनी देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे. अनेक शिक्षणमहर्षीनी देशात शिक्षणाचा प्रसार करुन समाज व देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विवेकानंद शिक्षण संस्था सर्वधर्म समभाव व मानवतावादी विचाराने शैक्षणिक कार्य करत आहे,’ असे विचार त्यांनी व्यक्त केले.

या वेळी एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड व कमांडो प्रात्यक्षिक सादर केले. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल अहिल्या सचिन चव्हाण हिचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते महाविद्यालयातील सेट परीक्षा उत्तीर्ण, पुस्तक लेखक व सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. एम. आर. पाटील, डॉ. ए. एस. महात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा. किरण पाटील, प्रा. एस. जी. गावंडे, प्रा. एस. एम. भोसले, प्रा. एस. एस. कुंडले, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, रवी चौगुले व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण पाटील यांनी केले. या ध्वजारोहण समारंभासाठी संस्था परिवारातील डॉ. बापूजी साळुंखे इंजि.कॉलेजचे प्राचार्य आर. जी. पाटील, डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टि.चे प्राचार्य धनराज भोसले, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज प्रमुख, संस्था कार्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी केले तर आभार डॉ. डी. बी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभावती पाटील व प्रा.  समिक्षा पाटील यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZLLBF
Similar Posts
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
विवेकानंद महाविद्यालयाचा वृक्षलागवड कार्यक्रम कोल्हापूर : राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ जुलै रोजी सागाच्या १०२ रोपांची लागवड करण्यात आली. डॉ. शरदचंद्र साळुंखे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘देश
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ
‘आजच्या पिढीने सज्ञानी व बलवान असावे’ कोल्हापूर : ‘वाईट परिस्थिती माणसाला जीवनामध्ये संघर्ष करायला शिकवते. माणसाला चांगले दिवस येण्यासाठी हेच मोठे विद्यापीठ असते. आजच्या पिढीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी सज्ञानी व बलवान व्हायला पाहिजे,’ असे प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीश आनंदराव देशमुख यांनी केले. विवेकानंद महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्त्व

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language