Ad will apear here
Next
९१ वर्षांच्या ब्रिटिश आजी ठरल्या करोनाप्रतिबंधक लशीच्या जगातल्या पहिल्या लाभार्थी


जग व्यापून टाकलेल्या करोनाला प्रतिकार करण्यासाठी लसी विकसित करण्याचे संशोधनकार्य अनेक देशांमध्ये सुरू असून, अनेक कंपन्या आणि सरकारी यंत्रणा त्यात कार्यरत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये लसीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता ब्रिटनने सामान्य नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा आठ डिसेंबरला सुरू केला असून, फायझर आणि बायोएनटेक या संस्थांनी विकसित केलेली लस नागरिकांना दिली जात आहे. मार्गारेट कीनन या आजी फायझरची कोविड-१९ प्रतिबंधक लस घेणाऱ्या जगातल्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांना ९१ वर्षे पूर्ण होत असून, वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मध्य इंग्लंडमधील कॉव्हेंट्री येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये मार्गारेट आजींनी आठ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ही लस घेतली. चाचण्यांनंतर नागरिकांना लसीकरण सुरू करणारा ब्रिटन हा पहिला पाश्चिमात्य देश ठरला आहे. 

‘कोविड-१९ची लस घेणारी पहिली व्यक्ती बनण्याचा मान मिळाल्यामुळे मला खूप खास वाटते आहे. वाढदिवसाआधी मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. गेल्या जवळपास वर्षभराचा काळ मला एकट्याला राहावे लागत होते. आता लस घेतल्यामुळे नव्या वर्षात मी माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवू शकेन,’ अशा भावना मार्गारेट आजींनी व्यक्त केल्या. ज्वेलरी दुकानात सहायक म्हणून काम करणाऱ्या या आजी चार वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या आहेत. त्यांना एक मुलगी, एक मुलगा आणि चार नातवंडे आहेत. 

फोटोग्राफर्स आणि टीव्ही प्रतिनिधींच्या उपस्थितीत मार्गारेट आजींना मे पार्सन्स नावाच्या नर्सने लस दिली.  

ब्रिटन हा युरोपातील करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे. तेथे ६१ हजारांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आता मात्र करोनावर मात करण्याचा विश्वास पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना वाटतो आहे. फायझर-बायोएनटेकच्या लसीचे लसीकरण करण्याचा निर्णय अमेरिका आणि युरोपीयन युनियनच्या आधी ब्रिटनने घेतला आहे. लसीकरण कार्यक्रम सुरू झालेला पाहता भावुक झाल्याची प्रतिक्रिया ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक आणि वैद्यकीय संचालकांनी दिली आहे. 

पहिल्या टप्प्यात ब्रिटनने फायझर-बायोएनटेकच्या चार कोटी लसींची मागणी नोंदवली आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन लसी लागणार असल्याने या लसी दोन कोटी नागरिकांना पुरतील. ब्रिटनची लोकसंख्या ६.७ कोटी आहे.  

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVRDCT
Similar Posts
... आणि न्यूझीलंड करोनामुक्त झाला! उद्यापासून व्यवहार पूर्ववत! वेलिंग्टन : सध्या जगभरात करोना कुठे किती वाढला, याच्याच बातम्या आहेत. त्यामुळे त्या बातम्यांकडे कितीही दुर्लक्ष करायचे म्हटले, तरी नकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडमधून एक अत्यंत सकारात्मक बातमी आली आहे. आजच्या घडीला न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण नसल्याचे न्यूझीलंडच्या
करोना विषाणू : जगातील ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले.. करोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे; पण घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ५०.७ टक्के रुग्ण यातून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. तसेच, जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ८०.९ टक्के रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत
खरंच भारत अमेरिकेपुढे झुकला? नाही! वस्तुस्थिती तशी नाही! जगातील किमान तीस देश आज हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसाठी भारतावर अवलंबून आहेत. त्या देशांकडे असणारी मोठी शस्त्रसज्जता, जीडीपी, क्षेपणास्त्रे, रणगाडे या सर्व गोष्टी निरर्थक ठरल्या आहेत; मात्र भारताला अमेरिकेकडून धमकावले गेले, अमेरिकेपुढे भारत झुकला, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही
करोना विषाणू - भारताची सज्जता, सिद्धता, उपाय - पंतप्रधान मोदींचे सार्क देशप्रमुखांसमोर भाषण करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन १५ मार्च २०२० रोजी सार्क समूहातील देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या संदर्भातील भारताची सज्जता, सिद्धता आणि उपाय, तसेच अनुभव यांसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language