Ad will apear here
Next
‘बूथ मजबूत होण्यावर मेहनत घ्या’
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कसा मजबूत होईल, ताकदवान होईल यावर प्रचंड मेहनत घ्या,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबिर २३ जुलैला प्रदेशाध्यक्ष आमदार  पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात आपण जिथे निवडणूक लढवू तिथे बुथ कमिटीची सभा होईल असे सांगतानाच लवकरच पाटणला पहिली सभा होईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. बुथ कार्यकर्त्यांची मते प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतली. 


या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, निरंजन टकले, सुधीर भोंगळे उपस्थित होते.

आमदार टकले म्हणाले, ‘पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा, राज्यसरकार ही केंद्रसरकारची झेरॉक्स कॉपी असुन केंद्रसरकार आपल्या पापांना पाठिशी घालते आहे तसेच राज्य सरकारही भ्रष्टाचारी आणि इतर चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालतात. बुथ कार्यकर्त्यांची संवादाची भूमिका असायला हवी. सरकारचे चुकीचे धोरण जनतेला समजावून सांगा. पाच वर्षांत यांनी काही केले नाही; पण निवडणूका जिंकल्या. या निवडणुकीत साम दाम दंड भेद हे अस्त्र वापरून यांनी निवडणूका जिंकल्या. त्यामुळे सर्वांची अवस्था वाईट होईल त्याआधीच आपण कंबर कसली पाहिजे, ही परिस्थिती लोकांसमोर मांडा.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZITCC
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
‘राष्ट्रवादी’तर्फे लोकसभेचे आणखी पाच उमेदवार जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली १२ उमेदवारांची यादी १४ मार्च २०१९ रोजी यादी जाहीर केल्यानंतर १५ मार्चला आणखी पाच उमेवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘राष्ट्रवादी’च्या रूपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारला मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली चाकणकर यांनी २९ जुलैला महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी २७ जुलैला चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. २९ जुलैला चाकणकर यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language