Ad will apear here
Next
मुक्तांगण निर्माण करतेय इस्लामपूरची वेगळी ओळख
मुक्तांगण शाळेच्या पदाधिकाऱ्यासमवेत आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णा डांगे

इस्लामपूर (सांगली) : येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ला माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे व आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. ‘बालशिक्षणाच्या चळवळीत सहज शिक्षण देताना     " ‘मुक्तांगण’ इस्लामपूर शहराची वेगळी ओळख निर्माण करत आहे,’ असे मत अण्णा डांगे यांनी व्यक्त केले. 

इस्लामपुरात गेल्या सहा वर्षांपासून चार वर्षांच्या आतील मुलांना ‘मुक्तांगण’मध्ये खेळातून शिक्षण दिले जाते. माजी मंत्री अण्णा डांगे व जयंत पाटील यांनी स्कूलला भेट देऊन पाहणी केली. विविध उपक्रम कसे राबविण्यात येतात, मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे घडवले जाते, यावर त्यांनी चर्चा केली. अण्णा डांगे म्हणाले, ‘बालपण टिकवण्यासाठी ‘मुक्तांगण’ने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मुलांसाठी मुक्तांगण हे अनुभव व खेळघर आहे. बालकांच्या भावविश्वाचा विचार करून प्रत्येक कृती केली जाते.’ 

जयंत पाटील म्हणाले, ‘इस्लामपूर शहरात चांगल्या दर्जाचे प्ले स्कूल हवे होते. ती शहराची गरज ‘मुक्तांगण’ने पूर्ण केली आहे. आदर्श नागरिक  निर्माण करण्यासाठी लहानपणी संस्कारांची गरज आहे. ‘मुक्तांगण’ने पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.’ 

स्कूलच्या अध्यक्षा सरोजिनी मोहिते यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. सचिव विनोद मोहिते यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZHYBD
 अभिनंदन सर .तुमच्या कल्पकतेतुन साकारलेल्या मुक्तांगनला नक्कीच भेट देऊ
 Thanks sir
Similar Posts
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
केक कापून साजरा केला शाळेचा पहिला दिवस इस्लामपूर (सांगली) : शाळेचा पहिला दिवस म्हटले, की शाळांमध्ये लहान मुलांचा   रडण्याचा आवाज येतो. पण इस्लामपूरमधील मुक्तांगण प्ले स्कूलच्या   आवारातील चित्र काहीसे वेगळेच होते. या शाळेत पहिल्या दिवशी केक कापून आनंद साजरा करण्यात आला.  शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षणातील
मुक्तांगण शाळेत रंगली चिमुकल्यांची दहिहंडी ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ मध्ये गोकुळाष्टमी निमित्त १२ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी करण्यात आली. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी ‘गोविंदा गोपाळा’ म्हणत दहिहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला.
मातीचे बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक इस्लामपूर (सांगली) : बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मध्ये मुलांना मातीपासून बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते. शनिवारी बेंदूर असल्याने या सणाची माहिती देण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language