Ad will apear here
Next
रत्नागिरीत ३० जानेवारीला पर्यटन परिषद
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती


रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याची हेतूने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास व नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

या परिषदेला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन सत्रांत होणार असून, सकाळी १० ते दुपारी दोन या पहिल्या सत्रामध्ये साहसी, निसर्ग, सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्लास्टिक, कचरामुक्त पर्यटनावर वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. साहसी पर्यटन सुहास ठाकुरदेसाई, निसर्ग पर्यटन नीलेश बापट, क्रोकोडाइल, नदी सफारी धीरज वाटेकर, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन सुधीर रिसबूड, कृषी पर्यटन सचिन कारेकर, आरोग्य पर्यटन डॉ. अभय धुळप, थीम पार्क व पर्यटनावर वैभव सरदेसाई हे प्रकल्प सादर करतील.

दुसर्‍या सत्रामध्ये दुपारी १२ ते दोन या वेळेत शाश्‍वत पर्यटन क्षमता व आव्हाने यावर चर्चासत्र होईल. यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक व पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी, शिक्षण संस्था, शासन प्रतिनिधी, अभ्यासक सहभागी होणार आहेत. तिसर्‍या सत्रात शाश्‍वत पर्यटन संधी, विकास व नियोजन यावर शासनाच्या विविध विभागातील प्रतिनिधी, मान्यवरांचे भाषण होणार आहे.

‘मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. समुद्रकिनार्‍यांचा विकासही केला जात आहे; मात्र पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे. यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो, यासाठी ही परिषद आयोजित केली आहे,’ असे संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZHLBW
Similar Posts
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
रत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे
सफर... रत्नागिरीत येण्याची... रत्नागिरी म्हणजे रत्नांची नगरी. अनेक नररत्ने या भूमीने देशाला दिली. या भूमीला इतिहासाचा वारसा आहे आणि इथला भूगोल मन रिझवणारा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा शुभ्र, रूपेरी वाळूचा, फेसाळणाऱ्या लाटा अंगावर घेणारा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. हिरवाईत सामावलेला निसर्ग, लाल मातीतील शिवारे,
‘थर्टी फर्स्ट’ला या रत्नागिरीच्या सुंदर समुद्रकिनारी... रत्नागिरी : सरत्या वर्षाची शेवटची सायंकाळ आणि नव्या वर्षाची पहिली पहाट संस्मरणीय असावी, या दृष्टीने पर्यटक वेगवेगळ्या जागांच्या शोधात असतात. अशा जागांमध्ये समुद्रकिनारे पर्यटकांच्या सर्वांत आवडीचे असतात. रत्नागिरीतील पांढरा समुद्र त्यापैकीच एक आहे. या समुद्रकिनाऱ्याचा परिसर सध्या कात टाकत असून, स्कूबा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language