करोडो भारतीयांच्या अंगावर राष्ट्रभक्तीचे रोमांच उभे करणाऱ्या ‘जन गण मन’ या गीताला १९५० साली २४ जानेवारी रोजी ‘राष्ट्रगीत’ म्हणून मान्यता मिळाली व दोनच दिवसांनी साजऱ्या झालेल्या भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ते राष्ट्रगीत म्हणून गायले गेले.
कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले हे मूळ गीत कलकत्त्यात काँग्रेस अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. मूळ बंगाली भाषेत रचलेले हे देशभक्तिपर गीत संपादित करून सुमारे ५० सेकंदांचे करण्यात आले.
या राष्ट्रगीताला सलाम!
जनगणमन-अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता!
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे,
गाये तव जयगाथा।
जनगणमंगलदायक जय हे भारतभाग्यविधाता!
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे।।
‘जन-गण-मन’ या गीताऐवजी बंकिमचंद्र यांचे वंदे मातरम् हे गीत राष्ट्रगीत असावे, ही मागणी तेव्हाच सुरू झाली व आजही होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होतात.
ते काहीही असो; जन-गण-मन ऐकल्यावर आपली मान अभिमानाने ताठ होते, हे मात्र खरं!
जय हिंद!
- भारतकुमार राऊत