Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
मुघल व निजामशाहीच्या दक्षिणेकडील संघर्षात निजामाने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरून आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करी विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला. या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज, असा इतिहासाचा दाखला देत डॉ. नीरज साळुंखे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य’मधून शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराचा आढावा घेतला आहे.

मराठा राज्य हे शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित कृती होती, हे लक्षात घेऊन याची मांडणी केल्याचे लेखक सांगतात. यामुळे कुकळ्ळीच्या धर्मयुद्धापासून मराठ्यांची घराणी, शहाजी महाराजांचा स्वतंत्र कारभार व त्यांची जहागिरी, दक्षिणेकडील मोहिमा यांचा इतिहास येतो. एकोजीराजांचे तंजावरचे राज्य, शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील स्वाऱ्या व विजय, तेथील मंदिरे, किल्ले यांची माहिती, असा गुजरात ते श्रीलंकेपर्यंतच्या शिवसाम्राज्याचा इतिहास येथे संदर्भ छायाचित्रांसह दिला आहे.
      
पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
लेखक : डॉ. नीरज साळुंके
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पाने : १६४
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZWYBY
Similar Posts
सुखी माणसांचा देश भूतान आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.
तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा ‘चेहरा’ देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे
सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
मराठे व इंग्रज पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language