Ad will apear here
Next
महात्मा फुले यांचा शिक्षणविचार
‘जनता शिक्षित झाली, तरच तिला आपल्या अंगभूत सामर्थ्याचे ज्ञान होईल आणि अंगीकृत कर्तव्याचे भान येईल’, असा महात्मा जोतिराव फुले यांचा विश्वास होता. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या मुळाशी महात्मा फुले यांचा शिक्षणविचार होता, असे डॉ. द. के. गंधारे यांनी म्हटले आहे.

महात्मा फुले यांच्या शिक्षणविचारांची मांडणी गंधारे यांनी या पुस्तकातून केली आहे. शिक्षण हे सद्गुणांची जोपासना करणारे हवे, असा फुले यांचा कटाक्ष होता. गंधारे यांनी प्रथम फुले यांच्या जीवनचारित्र्याची रूपरेषा सांगून त्यांच्या वाङ्मयाचा परिचय करून दिला आहे. अज्ञानाचे दुष्परिणाम काय होतात, याची जाणीव करून देऊन शिक्षणाच्या दूरगामी परिणामांची ओळख फुले यांनी करून दिली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी त्यांची मागणी होती. हा सर्व भाग या पुस्तकातून समजतो.

प्रकाशक : महात्मा फुले यांचा शिक्षणविचार
पाने : १४४
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUPBN
Similar Posts
नारद पुराणकाळात सर्वत्र संचार करणारी नारदाची व्यक्तिरेखा आजच्या काळातही आकर्षित करते. या व्यक्तिरेखेवर विस्ताराने क्वचितच कोणी लिहिले असावे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नारदाच्या जीवनावर आधारित लिहिलेली ही कादंबरी आहे.
मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती ‘शिस्त म्हणजे दबाव किंवा नियंत्रण नव्हे’, ‘तरुण मन ताजं असतं. काळाची बाधा त्याला होत नाही’, ‘नातं म्हणजे जीवन आहे’, ‘भय आणि सुख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भयरहित व्हायचं असेल, तर सुखावेगळं व्हावं लागेल’, ‘आपण आणि ही निरर्थकता वेगळी नाही. मी आणि ‘कुणी नाहीची पोकळी’ एकत्र आहे’, जे. कृष्णमूर्ती यांची
‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन उदगीर (लातूर) : ‘आजार व उपचारपद्धतींबरोबरच मनाला आनंद देणारे मानवी स्वभावाचे अनेक पैलू डॉ. संजय कुलकर्णी यांनी ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकातून मांडले आहेत. यात प्रसंगानुरूप छोटे लेख असले, तरी मोठा अर्थ व्यक्त करणाऱ्या मुक्त लेखनाचा हा चांगला नमुना आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ
श्री गुरुलीलामृत श्री अक्कलकोट महाराज यांची महती व माहिती सर्वदूर पोचलेली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची कायम रीघ असते. भक्तांच्या पाठीशी कायम उभे असलेल्या स्वामी सामर्थ्यांच्या लीला कै. गोपाळराव विद्वांस यांनी ‘श्री गुरुलीलामृत (कथासारासह)’ या एकवीस अध्यायी पोठीतून कथन केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language