Ad will apear here
Next
८७ वर्षांच्या मधुकर तळवलकरांकडून घ्या फिटनेसचा आदर्श (व्हिडिओ)
देशभरात प्रसिद्ध असलेल्या तळवलकर व्यायामशाळेचे मधुकर तळवलकर यांचा ८७वा वाढदिवस नुकताच झाला. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. व्यायामाच्या अत्यंत काटेकोर सवयीमुळे त्यांनी ही आरोग्यसंपन्नता साध्य केली आहे. त्यांचा याबद्दलचा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ येथे देत आहोत. 

मधुकर तळवलकर म्हणतात... 

आज मी ८७ वर्षांचा आहे. माझं आरोग्य अत्यंत उत्तम आहे. माझं शरीर कधीही, कशाचीही तक्रार करत नाही. माझे गुडघे कधीही मला अडचणीत आणत नाहीत, माझी पाठ-कंबर दुखत नाही आणि माझं हृदयही ठणठणीत आहे. हे सगळं कशामुळे साध्य झालं, तर आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी घेतलेले कष्ट, शिस्त, आई-वडिलांचं मार्गदर्शन, सात्त्विक पौष्टिक आहार आणि कुटुंबीयांचा पाठिंबा ही त्याची कारणं सांगता येतील.

तुम्ही तरुण आहात, मग सुदैवी आहात, आजच व्यायामाला सुरुवात करा! तुम्ही प्रौढ आहात, तरीही सुदैवी आहात. आजच व्यायामाला सुरुवात करा! आणि तुम्ही वृद्ध असलात, तर तुम्ही ज्ञानसंपन्न आहात. तुम्ही सुदैवी आहात. आजच व्यायामाला सुरुवात करा. शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घ्या... तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PVTUCT
Similar Posts
व्रतस्थ योग्याचं चटका लावणारं जाणं रत्नागिरीतील वैद्यचूडामणी प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचे आज (२७ जुलै) करोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language