Ad will apear here
Next
पालघर जिल्ह्याचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात
पालघर : जिल्ह्याचा तृतीय वर्धापनदिन जिल्हा परिषदेमार्फत उत्साहत साजरा करण्यात आला. या वेळी ‘आनंदी ऑगस्ट’अंतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाभरात दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रभात फेरी काढून हा दिवस साजरा केला. या वेळी शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर जनजागृती केली. स्काउट आणि गाइड्सच्या साह्याने हा उपक्रम यशस्वी झाला. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय बांधण्यावर न थांबता त्यापुढे जाऊन मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी आणि या विषावर जनजागृती करण्यासाठी सर्व शाळांमध्ये स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

स्तनपान सप्ताह साजरा करून अंगणवाडी केंद्रात स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्व विशद करण्यात आले. बाळाच्या पहिल्या दोन वर्षांत आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असून, त्यामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणावर मात करण्यासाठी स्तनपान करणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात असून, उत्कृष्ट चित्रकलेला बक्षीस दिले जाणार आहे. तृतीय वर्धापनदिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित समारंभात स्वच्छ भारत अभियान, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग आदी महत्त्वपूर्ण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

पेसा गाव घोषित झालेल्या ग्रामपंचायती आणि त्या गावातील लोकप्रतिनिधींना अधिसूचनेची प्रत प्रदान करण्यात आली; तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कार्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZXXBF
Similar Posts
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन ग्रामसेवकांचा सत्कार पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघरमधील संकुल सभागृहात पार पडली. पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दोन ऑक्टोबर २०१४नंतर शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या कुटुंबांचे फोटो केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्याला गती देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील १०० टक्के शौचालयांचे
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
कुपोषण निर्मूलनासाठी पदभरती पालघर : कुपोषण निर्मूलनासाठी व बालमृत्यू रोखण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत वैद्यकीय अधिकारी आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) या पदांसाठी आरोग्य विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे   यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात पावसाळ्या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language