Ad will apear here
Next
‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ
सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या हस्ते उद्घाटन
‘सोलवूड व्हेंचर’ दालनाचे उद्घाटन करताना अभिनेते सुबोध भावे व श्रुती मराठे. या वेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, किशोर जाधव, मंगेश हांडे, निवृत्त अप्पर वनरक्षक पांडुरंग मुंढे, शांताराम जाधव, सुनील कोकाटे आदी उपस्थित होते.

पुणे : दर्जेदार सॉलिडवूडपासून बनलेल्या आकर्षक डिझाइन्सच्या फर्निचरचे ‘सोलवूड व्हेंचर’ हे भव्य पाच मजली दालन कोंढवा येथे सुरू झाले असून, नुकतेच याचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवृत्त अप्पर वनरक्षक पांडुरंग मुंढे, शांताराम जाधव, किशोर जाधव, मंगेश हांडे, सुनील कोकाटे उपस्थित होते. 

सागवानापेक्षा अधिक टिकाऊ आणि युरोपातल्या काही निवडक ठिकाणी मिळणाऱ्या सॉलिडवूड या लाकडापासून बनवलेले फर्निचर येथे उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार फर्निचर बनवून घेण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. गृहसजावटीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूदेखील येथे आहेत. येथे एक संपूर्ण मजला जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या बाथरूम फिटिंग्जने सज्ज आहे. 

‘बाजारपेठेचा वेध घेताना, इतिहासाची पाने उलटावी लागतात. स्थित्यंतराचा आढावा घेताना, लोकसंख्येचा आणि बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव जाणून घ्यावा लागतो. त्याचबरोबर अर्थकारणासह त्या त्या बाजारपेठेतील समाजघटकांचा, शहराच्या उभारणीतील सहभागदेखील समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. हा सर्व विचार प्रत्येक व्यवसायिकाने करावा,’ असे मत सुबोध भावे यांनी व्यक्त केले. 

या दालनाचे प्रवर्तक आणि भागीदार किशोर जाधव  म्हणाले, ‘आज पुण्याचा विकास चारही बाजूंनी होत आहे. समाजातील मध्यमवर्ग, उच्चवर्ग यांच्या आवडीनिवडी, अपेक्षा लक्षात घेऊन उत्तमोत्तम फर्निचर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांना स्वतः आपल्या अपेक्षेनुसार लाकूड निवडता येणार आहे.’
या वेळी मंगेश हांडे म्हणाले, ‘व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणेही महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही या पाच मजली दालनाच्या वरच्या मजल्यावर सृजनवेध हा कट्टा सुरू करत आहोत. येथे दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखती, गप्पा, व्याख्याने, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSZCF
Similar Posts
‘पुष्पक विमान’ येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला पुणे : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. आजोबा आणि नातवाच्या दोस्तीची गोष्ट सांगणारा ‘पुष्पक विमान’ हा ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती आणि सुबोध भावे लिखित चित्रपट येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैभव चिंचाळकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language