Ad will apear here
Next
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन
ट्राईब छत्री कलादालनात २७ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन

पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच  दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे. 

‘पर्वती पायथा येथील महिला मंडळात हे कलादालन असून, येथे २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे,’ अशी माहिती ट्राईब छत्रीचे संस्थापक श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांनी दिली.  


या प्रदर्शनात आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थानसह महाराष्ट्रातील मेळघाटातील कोरकू छत्तीसगड येथील माडिया आदिवासींनी बांबू, पाम वृक्षाची पाने यापासून बनवलेले आकाशकंदील, सिरॅमिकच्या रोली कँडल्स,  लेदर लॅम्प शेड, हँगिंग लॅम्प, टेबल टॉप लॅम्प, रॉट आयर्न प्रकारातील लामणदिवे असे अनेक प्रकारचे आकर्षक दिवे आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTKCF
Similar Posts
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
‘सेवासदन’च्या वतीने फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन पुणे : येथील सेवासदन संस्थेच्या दिलासा कार्यशाळेच्या वतीने दिवाळीसाठीच्या फराळ व कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १८ ऑक्टोबर व शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत हे प्रदर्शन पटवर्धन बाग येथील दिलासा कार्यशाळा येथे भरणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language