रत्नागिरी : सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इंद्रधनुष्य यांच्या वतीने गीतरामायणाचा कार्यक्रम १९ एप्रिल २०१९ रोजी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अनुराधा गोखले, सिद्धी बोंद्रे, अभिजित भट आणि श्रीरंग भावे आदी गायक बाबुजींच्या चालींनी अजरामर ठरलेली गीतरामायणातील गीते सादर करणार आहेत. त्यांना सचिन भावे, मिलिंद टिकेकर (तबला), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), उदय गोखले (व्हायोलिन), वैभव फणसळकर (की-बोर्ड), हरेश केळकर (तालवाद्य) हे संगीतसाथ करणार आहेत. एस कुमार साउंड सर्व्हिसेसचे ध्वनिसंयोजन असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘इंद्रधनुष्य’तर्फे करण्यात आले आहे.