Ad will apear here
Next
विधानसभा निवडणुकांवर ठरणार शेअर बाजाराची चाल
शेअर बाजारासाठी २८ सप्टेंबरचा शुक्रवार वाईट ठरला. निर्देशांक व निफ्टी तसे फार घसरले नाहीत; पण बरेच शेअर्स २० ते ४० टक्क्यांनी घसरले. आता यापुढे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर शेअर बाजाराची चाल ठरेल. या पार्श्वभूमीवर, सध्या खरेदीसाठी योग्य असलेल्या शेअर्सबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
.....
आयएल अँड एफएस कंपनीच्या कर्जाच्या परतफेडीबद्दल शंका निर्माण झाल्या, तर येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने फक्त तीन महिने मुदतवाढ दिल्याने व त्यांच्याविरुद्ध काही आरोप झाल्यामुळे बँकेतील व्यवस्थापकांपुढचे पेच वाढले. राणा कपूर यांच्याप्रमाणेच दोन महाव्यवस्थापकांनाही रिझर्व्ह बँकेने अल्पशी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ३५० रुपयांपर्यंत असलेल्या येस बँकेच्या शेअरने शुक्रवारी (२८ सप्टेंबर २०१८) १६५ रुपयांचा नीचांक गाठला आणि तो १८४ रुपयांवर तो बंद झाला. सध्याच्या भावाला तिचे किं/उ गुणोत्तर फक्त १०.२ पट आहे. जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांनी आता तो खरेदी केला, तर दोन महिन्यांत त्यांना शेअरमागे ५० रुपये तरी नफा सुटेल; मात्र खरेदी प्रत्येकाने आपल्याला कुवतीनुसार जोखमीवर करावी. इथे फक्त माहिती दिली आहे. 

येस बँकेप्रमाणेच गेल्या आठवड्यात दिवाण हाउसिंग फायनान्सचा शेअरही अकारण घसरून २५२ रुपयांपर्यंत आला. बाजार बंद होताना तो २७५ रुपयांपर्यंत वर गेला. वर्षभरातील या शेअरचा कमाल ६९५ रुपयांचा भाव बघता सध्या खरेदीसाठी किंमत आकर्षक वाटते. इंडिया बुल्स हाउसिंगचा शेअरही ८५० रुपयांच्या आसपास, फक्त नऊपट किं/उ गुणोत्तराला उपलब्ध आहे. वर्षभरातील त्याचा उच्चांक १४४० रुपये इतका आहे. 

गुंतवणुकीसाठी योग्य असा तिसरा शेअर म्हणजे स्टरलाइट टेक्नॉलॉजीज हा आहे. कंपनीच्या संचालकांनी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन दीड कोटी टनांवरून तीन कोटी टनांवर न्यायचे ठरवले आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचा शेअर शुक्रवारी २६४ रुपयांवर मिळत होता. तो घेण्याजोगा आहे. कंपनी केंद्र सरकारच्या भारतमाला या पश्चिम किनाऱ्यावरील प्रकल्पासाठी ऑप्टिकल फायबर केबल्स पुरवणार आहे. याच क्षेत्रातील विंध्या टेलिलिंक्स शेअरचाही गुंतवणुकीसाठी विचार करायला हरकत नाही. हा शेअर सध्या १२९३ रुपयांपर्यंत आहे. वर्षभरातील १७०० रुपयांचा उच्चांक तो पुन्हा २०१९च्या दिवाळीपर्यंत गाठू शकेल. 

शेअर बाजारातील आणखी एक चांगला शेअर म्हणून ‘नाल्को’चे (नॅशनल अॅल्युमिनियम) नाव घेता येईल. शुक्रवारी तो ६१ रुपयांना मिळत होता. जगात अॅल्युमिनियमचे भाव वाढत आहेत. या कंपनीच्या स्वत:च्या बॉक्साइटच्या खाणी आहेत. 

ग्राफाइट इंडिया व हेग हे शेअरदेखील उतरून अनुक्रमे ८४३ व ३३४५ रुपयांवर आले आहेत. चीनच्या ग्राफाइट कंपन्या २०१९च्या मध्याला सुरू होतील. तोवर या शेअर्सचे उत्तरायण चालू राहील. खरेदीत ३० टक्के नफा मिळाला, की जास्त लोभ न ठेवता विक्री करावी. 

आता येत्या काही महिन्यांत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होतील. तिथल्या यशापयशावर बाजार आपली चाल ठरवेल.

 - डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZFUBS
Similar Posts
शेअर बाजारात अस्थिरतेचा कल शेअर बाजारात गेल्या आठवड्यात झालेली मोठी पडझड बघता, आता द्रवता, ‘सेबी’चे कडक नियम, दलालांची कसरत आणि आपले व जागतिक अर्थकारण यावर बाजार हेलकावे खाईल. अनेक शेअर्सचे भाव पडल्यामुळे खरेदीसाठी संधी असली, तरी निवडक शेअर्स घेणेच लाभदायी ठरेल. अशा शेअर्सबाबत माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
गतिमान अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजारही तेजीत गेल्या आठवड्यात शेअर बाजार स्थिर होता; मात्र जून २०१८ तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ८.२ टक्क्यांवर गेल्याची बातमी आल्याने येत्या आठवड्यात बाजारात तेजीच राहावी. पेट्रोलचे जागतिक भाव वाढण्याची शक्यता असल्याने आपल्याकडे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक
रेपो दरात कपात झाल्यास शेअर बाजारात तेजी सध्या शेअर बाजार संथ असून, रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरणाची सर्वांना प्रतीक्षा आहे. रेपो दरात कपात झाल्यास बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. या स्थितीत काही निवडक शेअर्स घेण्यायोग्य आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
बँकांचे शेअर्स वधारण्याची शक्यता शेअर बाजारात सध्या मंदीचे वातावरण असले, तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन विदेशी गुंतवणूकदारांची एक बैठक घेणार आहेत. या बातमीने शुक्रवारी शेअर बाजार वधारला. बँकांचे शेअर्सही आता वर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील आणि अन्य क्षेत्रांतील गुंतवणूकयोग्य शेअर्सबाबत जाणून घेऊ या समृद्धीची वाट या सदरात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language