Ad will apear here
Next
सांधेदुखी क्लिनीक ‘इम्युनेक्स’ आता मुंबईतही
मुंबई : ‘इम्युनेक्स’ या सांधेदुखी क्लिनीकच्या शुभारंभामुळे सहज उपचार पद्धतीसाठी संधीवाताच्या रुग्णांना आता मुंबईबाहेर जावे लागणार नाही. हे केंद्र अंधेरी पश्चिम येथे सुरू करण्यात आले आहे.

सहज उपचार पद्धती ही प्रख्यात ऑस्ट्रेलियन उपचार पद्धती असून कोणत्याही शस्त्रक्रियेविना सांधेदुखीच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. या पद्धतीने जगातील लाखो रुग्णांचे आयुष्य वेदनारहित झाले असून त्याची माहिती केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी एका संवाद कार्यक्रमाद्वारे देण्यात आली.

सहज उपचार पद्धतीची माहिती देताना डॉ. विनोद जैन वोरा यांनी सांगितले की, ‘भारतातील अनेक शहरांत सहज उपचार पद्धतीची केंद्रे सुरू झाली असून पुण्यातही लवकरच सहजचे नवे केंद्र सुरु होईल. स्ट्रॉमल व्हॅस्कूलर फ्रॅक्शन (एसव्हीएफ) या नावाने जगभर प्रसिद्ध असलेली ही ऑस्ट्रेलियन उपचार पद्धती असून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील हजारो संधीवाताच्या रुग्णांवरचे उपचार यशस्वी झाले आहेत. भारतात या उपचार पद्धतीचे अधिकार सहज हॉस्पिटलकडे असल्याने या पद्धतीचे नामकरण सहज उपचार पद्धती असे केले गेले आहे. भारतात इंदूरचे सहज हॉस्पिटल, जयपुरचे संतोकबा दुर्लभजी मेमोरियल हॉस्पिटल यांसह बडोदे, अहमदाबाद, भोपाळ, मुंबई येथे आता उपचार केंद्रे असून हजारो रुग्ण वेदनामुक्ती अनुभवत आहेत.

संधीवात वा सांधेदुखीत सांधे बदलण्याच्या अन्य तंत्रांच्या तुलनेत सहज उपचार पद्धती ही अधिक सोपी, प्रभावी आणि यशस्वी पद्धती आहे. या उपचारांमुळे रुग्णांच्या जीवनशैलीत अन्य कुठलेच बदल होत नसून रुग्ण आरामात चालू, बसू, उठू शकतो. सांध्यांच्या शस्त्रक्रियेला हा अत्यंत सुरक्षित आणि यशस्वी पर्याय असून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये २४ तासांहून कमी वेळ दाखल व्हावे लागते. यात रुग्णाच्या सांध्यामध्ये एसव्हीएफ इंजेक्शन दिले जाते. जिथे इंजेक्शन दिले जाते त्या जागी भूल अर्थात एनेस्थेशिया दिला जात असल्याने रुग्णाला वेदनारहित उपचार मिळतात आणि टाके घालण्याचीही गरज नसते.

पत्ता : ३०१, लँडमार्क, इन्फिनिटी मॉलसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMFBF
Similar Posts
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान मुंबई : ‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language