नागो भाति मदेन स्वं जलधरैः पूर्णेन्दुना शर्वरी शीलेन प्रमदा जवेन तुरगो नित्योत्सवैर्मन्दिरम्।
वाणी व्याकरणेन हंसमिथुनैर्नद्य: सभा पण्डितै: सत्पुत्रेण कुलं नृपेण वसुधा लोकत्रयं भानुना॥
मराठी अर्थ : हत्ती मदामुळे, आकाश सजल मेघांमुळे, रात्र पूर्ण चंद्रामुळे, तरुण, सुंदर स्त्री चारित्र्यामुळे, घोडा वेगामुळे, मंदिरे उत्सवांमुळे, वाणी व्याकरणामुळे, नद्या हंसाच्या जोडप्यामुळे, सभा विद्वानांमुळे, कुल (घराणी) सत्पुत्रांमुळे, पृथ्वी राजामुळे आणि तिन्ही लोक सूर्यामुळे शोभतात.
A tusker with intoxication, a sky with rain-clouds (a water pond with lotuses), a night with full moon, a woman with good character, a horse with speed, a temple with regular festivals, a speech with good grammar, rivers with pairs of swans, an assembly with scholars, a family with noble son, kingdom with a good King and the Universe (all the three worlds) with the Sun (Lord Vishnu) appear splendid (shine).
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)