Ad will apear here
Next
राजापुरातील दिव्यांग मेळाव्याला प्रतिसाद
मार्गदर्शन करताना राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे. शेजारी मान्यवर.

राजापूर :
राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.

या वेळी राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, नगरसेवक गोविंद चव्हाण, सुभाष बाकाळकर, पाली हायस्कूलचे प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नायब तहसीलदार रसाळ उपस्थित होते. ‘दिव्यांगांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा. ज्यांचा जन्म डिसेंबर २०००पूर्वी झाला आहे व एक जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींनी मतदार नावनोंदणी करावी,’ असे आवाहन करण्यात आले. या वेळी ३० जणांना नमुना फॉर्मचे वितरण करून फॉर्म भरून घेण्यात आले. निवडणूक नायब तहसीलदार श्री. राठोड या वेळी उपस्थित होते. पंचायत समितीचे कर्मचारी राम ठाकूर यांनी जिल्हा परिषद योजनांची माहिती दिली. दिव्यांग बांधवांचे मतदान नोंदणीचे फॉर्म भरून घेतले.

मेळाव्याला उपस्थित दिव्यांग बांधव.

मेळाव्याला राजापूर तालुक्यातील १२५ दिव्यांग बांधव उपस्थित होते. नगर परिषदेने दिव्यांग बांधवांच्या तीन टक्के निधीमधून या वर्षी लाभार्थींना घरघंटी, झेरॉक्स मशिन, व्हीलचेअर, कम्प्युटर इलेक्ट्रिक साहित्य, दुकानासाठी अनुदान मंजूर केल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. काही अडचणी आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. आहे. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी नगर परिषद व नगराध्यक्षांचे आभार मानले. कार्यक्रमाला पालिकेचे मुख्य लिपिक किशोर जाधव, विनायक पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZWABT
Similar Posts
दिव्यांगांसाठी राजापूरला स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिर रत्नागिरी : राजापूर बाजारपेठेतील नगर परिषद हॉलमध्ये (पिक अप शेड हॉल) ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग मेळावा व स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर नगर परिषद व रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत
‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’ रत्नागिरी : ‘रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन संस्था सच्चा समाज निर्माण करण्याचे काम करत आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यावर भर देते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी समाज, शासकीय यंत्रणा, शासन-प्रशासनाने आत्मविश्‍वास दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
... आणि व्हीलचेअरवर लग्न लागलं...! रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नवेट-हरचिरी येथील चि. सौ. कां. सुवर्णा येरीम आणि शिरोळ (कोल्हापूर) येथील चि. योगेश खाडे यांचा विवाह नुकताच थाटात पार पडला. सुवर्णा पोलिओग्रस्त आहे, तर योगेशला अपघातामुळे अपंगत्व आलेले आहे. व्हीलचेअरवरून आलेल्या या नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language