Ad will apear here
Next
मुंबईत प्रथमच स्मार्ट आशिया प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : दी तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने मुंबईत प्रथमच ‘स्मार्ट आशिया-एक्स्पो अँड समीट २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन भरणार आहे. 

या प्रदर्शनात अर्बन सिटी प्लॅनिंग, आयओटी सोल्यूशन्स,  स्मार्ट वाहतूक, जल व्यवस्थापन, शाश्वत पर्यावरण आणि स्मार्ट सिटी हे विषय हाताळले जातील. यामध्ये शाश्वत शहर नियोजन या विषयावर विशेष भर राहणार आहे. 

या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना दी तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष जेम्स हुअंग म्हणाले, ‘भारतातील रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि वाहतूक यासारख्या शहर नियोजनाला हातभार लावणाऱ्या घटकांच्या साथीने आम्ही आमची आर्टीफिशियल इंटेलिजंट अर्बन सिटी सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे उत्पादकतेला चालना मिळेल.’ 

या प्रदर्शनाला डेल्टा इलेक्ट्रॉनिक्सचे आर. टी. त्साई, अॅडव्हान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट रिसर्च सेंटरचे प्रोफेसर आणि डायरेक्टर एस. के. चांग, तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे प्रोजेक्ट ऑफिसर नरेश प्रधान उपस्थित राहणार आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWLCF
Similar Posts
स्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात मुंबई : स्मार्ट सिटी उभारण्यासाठी आवश्यक यंत्रणा, तंत्रज्ञान, सेवा, उत्पादने यांचे ‘स्मार्ट आशिया 2019’ प्रदर्शन नुकतेच मुंबईत सुरू झाले. तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतातील तैपेई
रेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार मुंबई : भारतातील सर्वात मोठी वॉटर हीटिंग सोल्यूशन्स पुरवठादार रेकोल्डने ‘सुपरब्रँड्स’ हा पुरस्कार जिंकत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेनंतर सुपरब्रँड म्हणून निवडला गेलेला रेकोल्ड हा वॉटर हीटिंग विभागातला एकमेव ब्रँड आहे. हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सनाच दिला जातो
आयसीआयसीआय बँकेने दिले वीस लाखांहून अधिक फास्टॅग मुंबई : आयसीआयसीआय बँकेने आतापर्यंत वीस लाखांहून अधिक फास्टॅग जारी केले असून, देशातील कोणत्याही वित्तीय संस्थेने नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे. बँकेने येत्या सहा महिन्यांत ही संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language