Ad will apear here
Next
अंतरंग युवा मनाचे
एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या....अशा समस्या विचारात घेऊन, युवकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं प्रा. नंदकुमार कुलथे यांनी ‘अंतरंग युवा मनाचे’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाबद्दल...
..........................

जवळपास ८० वर्षांपूर्वी, म्हणजे १९३६ साली, डेल कार्नेजी या अमेरिकन लेखकाचं ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल’ हे सेल्फ हेल्प प्रकारातलं आद्य पुस्तक आलं आणि त्यानं इतिहास घडवला. त्याचा जगभरात अक्षरशः विक्रमी खप झाला आणि पाहतापाहता त्या पुस्तकाच्या विक्रीचा आकडा तीन कोटींवर जाऊन पोहोचला. मित्र कसे जोडावेत आणि लोकांवर छाप कशी पाडावी हे अत्यंत सोप्या भाषेत आणि रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन त्याने सांगितलं होतं. पाठोपाठ १९४८मध्ये त्याचं दुसरं पुस्तक बाजारात आलं ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग’ आणि तेही पहिल्या पुस्तकाप्रमाणेच बेस्ट सेलर्सच्या यादीत जाऊन बसलं.

...म्हणजे ‘जगात आपण नक्की वागावं कसं’ ही भारतीय तरुणाईला ग्रासणारी समस्या ही तसं पाहिलं तर जागतिक तरुणाईची आहे आणि ती केवळ आजच्या स्पर्धात्मक युगातली नसून, तिची सुरुवात गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासूनच झाली आहे, हे महत्त्वाचं! या संदर्भात जगातल्या जवळपास प्रत्येक भाषेत शेकड्यांनी पुस्तकं लिहिली गेली आहेत, तशीच ती आता मराठीतही यायला लागली आहेत. आजच्या संगणकीय महाजालाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. क्षेत्र कुठलंही असो, इच्छुक मनुष्यबळ प्रचंड संख्येनं असल्यामुळे भारतातल्या आजच्या युवक-युवतींसमोर त्या स्पर्धेमुळे येणारा तणाव आणि त्यातून उद्भवणारं नैराश्य अशाही समस्या वाढीला लागल्या आहेत. एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतरही अनेक समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, नोकरीची चिंता, लग्नाची चिंता, लग्नानंतर उद्भवणाऱ्या वैवाहिक समस्या, त्यातून होणारे घटस्फोट, फेसबुक/व्हॉट्सअॅपच्या अतिरिक्त वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या....हे सगळं भयानक वास्तव आज आपण आपल्या आजूबाजूला रोजच बघतो आहोत.

या आणि अशा अनेक प्रकारच्या युवकांच्या समस्या विचारात घेऊन, युवकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने प्रा. नंदकुमार कुलथे यांनी ‘अंतरंग युवा मनाचे’ हे पुस्तक लिहिलं आहे. मानसशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय आणि तो शिकवत असताना त्यांनी तरुणाईच्या अस्वस्थ मनाचा अचूक अंदाज घेतल्याचं हे पुस्तक वाचताना जाणवतं.

युवकांनी आपलं व्यक्तिमत्त्व कसं सुधारावं, मानसिक आरोग्य कसं जपावं, सभाधीटपणा कसा मिळवावा, युवकांची वैवाहिक जीवनासंबंधी भूमिका काय असावी, संभ्रमावस्था कशी दूर करावी, लैंगिक शिक्षणाचं महत्त्व काय, अभ्यास कसा करावा, परीक्षेला तोंड कसं द्यावं, मुलाखतीचं तंत्र काय असतं अशा वेगवेगळ्या समस्यांचा परामर्श घेत घेत अखेर व्यक्तीव्यक्तींमधले मानवी व्यवहार उत्तम राखून समर्थ युवक कसं बनता येईल या सर्व बाबींवर कुलथे यांनी अत्यंत सोप्या भाषेत, रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देत हे ‘हाऊ टू..’ प्रकारातलं युवकांना मार्गदर्शक ठरणारं पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे. याचा आजच्या तरुण पिढीला नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.
............................
पुस्तक : अंतरंग युवा मनाचे
लेखक : प्रा. नंदकुमार कुलथे
प्रकाशक : शांती पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १४४
मूल्य : २१० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी http://www.bookganga.com/R/7L10W या लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZENBE
Similar Posts
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
परिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...
आमंत्रण स्वर्गाचे मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय
सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व! त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language