Ad will apear here
Next
‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय यश
यश बारगुजे, जितेंद्र चौधरी, वैष्णवी मोरे यांची कामगिरी
वैष्णवी मोरे हिचा सत्कार करताना सुषमा चोरडिया, डॉ. संजय चोरडिया आणि अनुपम भटनागर.

पुणे : ‘सूर्यदत्ता’च्या यश बारगुजे, जितेंद्र चौधरी आणि वैष्णवी मोरे या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या यश बारगुजे याने पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला. तो आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.  

सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित १९ वर्षांखालील पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला असून, या संघातील जितेंद्र चौधरी याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो आता पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. 

यश बारगुजे
नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मुलींच्या गटात सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या वैष्णवी मोरे हिने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, फिटनेस अँड स्पोर्ट डायरेक्टर निशिगंधा पाटील, अनुपम भटनागर, संकेत नालकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
जितेंद्र चौधरी याचा सत्कार करताना सुषमा चोरडिया, डॉ. संजय चोरडिया आदी

या वेळी बोलताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा ‘सूर्यदत्ता’ला अभिमान आहे. या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. सामाजिक भान, सांघिक भावना, नेतृत्व, सहनशीलता आदी गोष्टी मुलांना आत्मसात करता येतात. शिस्तीच्या सवयींबरोबरच त्यांना अपयशातून यश मिळवण्याचा विश्वास मिळतो. त्यामुळे ‘सूर्यदत्ता’मध्ये खेळांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली जाते.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZTACF
Similar Posts
'सूर्यदत्ता'च्या युवराज दळवीचे लॉन टेनिस स्पर्धेत यश पुणे : सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या युवराज दळवी याने यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी युवराज दळवी याला मिळणार आहे.
‘सूर्यदत्ता’च्या श्रावणी, अनुश्रीला जिम्नॅस्टिक्समध्ये विजेतेपद पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी पेंडसे हिने प्रथम, तर अनुश्री कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language