पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले.
ती सूर्यदत्ता पब्लिक स्कुलमध्ये बारावीत (शास्त्र) शिकत असून, तिच्या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी प्रमाणपत्र, सुवर्णपदक देऊन तिचे अभिनंदन केले; तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. या वेळी सूर्यदत्ता फिटनेस स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या निशिगंधा पाटील उपस्थित होत्या.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘सावरी हिचे यश संस्थेसाठी कौतुकास्पद आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खेळांसाठी प्रोत्साहन देत असल्याने संस्थेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. खेळाचे अनेक फायदे असल्याने अभ्यासासोबतच खेळांवर भर दिला जात असून, त्यामुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहत आहे. मुलांचा क्रिडा क्षेत्राकडे कल वाढावा, याकरिता सूर्यदत्ताच्या स्पोर्ट्स अॅकॅडमीद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत. या गुणवान खेळाडूंना भविष्यात विविध स्तरांवरील स्पर्धांसाठी लागणारे मार्गदर्शन व इतर सुविधा पुरविण्यात येतील.’