Ad will apear here
Next
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना प्रीती जोसेफ. या वेळी डॉ. संजय चोरडिया, सीमा दाबके, कॅप्टन शालिनी नायर, अक्षित कुशल, सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.

पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन आपण नियमित व्यायाम, योग्य आहार आणि अधूनमधून आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे,’ असे मत डिव्हाइन कॉज सोशल फाउंडेशनच्या प्रीती जोसेफ यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या वतीने ‘सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट’ अंतर्गत बावधन कॅम्पसमध्ये आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. शिबिरावेळी डॉ. संजय चोरडिया, लायन्स क्लबच्या सीमा दाबके, ‘सूर्यदत्ता’च्या संचालिका कॅप्टन शालिनी नायर, संचालक अक्षित कुशल, सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते. पुण्यातील नामवंत डॉक्टरांकडून ही आरोग्य तपासणी करण्यात आली. दंत तपासणी, पूर्ण शरीराची तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी आणि हृदयरोग तपासणी करण्यात आली. डॉ. दीपाली कोलते, डॉ. अस्लम, डॉ. दीपक पाटील, डॉ. सुहास एरंडे व सहकाऱ्यांनी ही तपासणी केली.


तपासणीनंतर ज्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांना तज्ज्ञ सल्ला व समुपदेशनासाठी पाठविण्यात आले; तसेच जीवनशैली बदलण्याचा आणि वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. 

‘आज समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जीवनशैली, शारीरिक मानसिक व भावनिक आरोग्य याविषयी अनेक समस्या आहेत. त्यातून बाहेर पाडण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट नियमितपणे राबवत आहे. विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला,’ असे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUFCF
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या श्रावणी, अनुश्रीला जिम्नॅस्टिक्समध्ये विजेतेपद पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी पेंडसे हिने प्रथम, तर अनुश्री कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
सूर्यदत्ता अॅनिमेशन इन्स्टिट्यूट देशातील पहिल्या तीन संस्थांमध्ये पुणे : देशातील पहिल्या तीन क्रमांकाच्या अॅनिमेशन प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटने स्थान मिळवले आहे. ‘टॉप अॅनिमेशन एज्युकेशन ब्रँड्स २०१९’मध्ये व्हिसलिंग वूड्स, पिकासो, एनआयडी यासारख्या नामवंत संस्थांबरोबर ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटचा सन्मान करण्यात आला. यामुळे
'सूर्यदत्ता'च्या युवराज दळवीचे लॉन टेनिस स्पर्धेत यश पुणे : सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या युवराज दळवी याने यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी युवराज दळवी याला मिळणार आहे.
‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय यश पुणे : ‘सूर्यदत्ता’च्या यश बारगुजे, जितेंद्र चौधरी आणि वैष्णवी मोरे या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language