Ad will apear here
Next
आयसीआयसीआय बँकेने दिले वीस लाखांहून अधिक फास्टॅग
पुढील सहा महिन्यांत दुप्पट संख्या करण्याची योजना

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने आतापर्यंत वीस लाखांहून अधिक फास्टॅग जारी केले असून, देशातील कोणत्याही वित्तीय संस्थेने नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे. बँकेने येत्या सहा महिन्यांत ही संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

फास्टॅग हे इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लि.च्या (आयएचएमसीएल) मालकीचे ब्रँडनेम असून, त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक टोलिंग व एनएचएआयचे अन्य संबंधित प्रकल्प राबवले जातात. हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) टॅग असून, तो वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. हा वापरण्यास सोपा, रीलोड करता येणारा टॅग सर्व टोल शुल्क आपोआप वजा करतो आणि वाहनाला टोल नाक्यावर रोख पैसे देण्यासाठी थांबावे लागत नाही.

आयसीआयसीआय बँक आतापर्यंत मूल्य व प्रमाण या दोन्ही बाबतीत इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. फास्टॅगवरील व्यवहारांच्या एकूण संख्येच्या बाबतीत बँकेने निम्म्याहून अधिक बाजारहिस्सा मिळवला आहे. मूल्याच्या बाबतीत, बँकेचा हिस्सा ६० टक्के आहे. सप्टेंबर 2019 मध्ये, या क्षेत्रात झालेल्या एकूण २९ दशलक्ष फास्टॅग व्यवहारांपैकी जवळजवळ १५.४ दशलक्ष व्यवहार हे आयसीआयसीआय बँकेने केले होते व त्यांचे एकूण मूल्य अंदाजे ३९५ कोटी रुपये होते.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख सुदिप्त रॉय म्हणाले, ‘देशातील राष्ट्रीय महामार्गांवर आयएचएमसीएलबरोबर ईटीसीची अंमलबजावणी करणे, हे आयसीआयसीआय बँकेसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. मुंबई-वडोदरा कॉरिडॉरवर ही नावीन्यपूर्ण सेवा सुरू करणारी आम्ही पहिलीच बँक होतो. आम्ही यशस्वीपणे काही बेंचमार्क निर्माण केले आहेत आणि आता त्यांचा वापर सर्व बँकांमध्ये इंटर-ऑपरेबिलिटीसाठी राष्ट्रीय प्रमाणके निर्माण करण्यासाठी केला जात आहे. देशामध्ये दर वर्षी टोल क्षेत्रामध्ये अंदाजे वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यापैकी, अंदाजे ३० टक्के टोल ईटीसी सुविधेद्वारे संकलित केला जातो. म्हणजेच, या महत्त्वाच्या पेमेंटच्या बाबतीत डिजिटायझेशन मोहीम राबवण्यासाठी प्रचंड संधी असल्याचे दिसून येते. सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्याच्या नव्या सूचनेच्या अनुषंगाने, येत्या सहा महिन्यांत आमच्या फास्टॅगमध्ये दुपटीने, चाळीस लाखांपर्यंत वाढ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही ईटीसी कार्यक्रमांतर्गत नवे महामार्ग समाविष्ट करणार आहोत. फास्टॅग पेमेंटचे अन्य नावीन्यपूर्ण उपयोग करण्यासाठी आम्ही विविध भागीदारांशी सहयोग करत आहोत, जसे विमानतळ व मॉल येथे पेमेंट करणे. फास्टॅगची उपलब्धता वाढवण्यासाठी आम्ही महत्त्वाच्या ई-कॉमर्स पोर्टलबरोबरही भागीदारी करण्याचा विचार करत आहोत. सध्या, बँक राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील २१२ टोल प्लाझा हाताळते. फास्टॅग कार्यक्रमांतर्गत सध्या सुरू असलेले अंदाजे ४० टक्के टोल प्लाझा यामध्ये समाविष्ट होतात. आमचे कार्य आणखी विस्तारण्यासाठी, बँकेने उत्पादनापासूनच फास्टॅग जारी करण्यासाठी व वापरण्यासाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने बँकेने आघाडीच्या वाहन उत्पादकांशी सहयोग केला आहे. बँकेने हजारो फ्लीट मालक व मोठ्या राज्य वाहतूक कंपन्या यांच्याशी करार केले आहेत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRHCF
Similar Posts
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज; २०१९-२०चा आर्थिक पाहणी अहवाल सादर मुंबई : महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच, राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत दोन लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा राज्याच्या २०१९-२०च्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून,
रेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार मुंबई : भारतातील सर्वात मोठी वॉटर हीटिंग सोल्यूशन्स पुरवठादार रेकोल्डने ‘सुपरब्रँड्स’ हा पुरस्कार जिंकत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेनंतर सुपरब्रँड म्हणून निवडला गेलेला रेकोल्ड हा वॉटर हीटिंग विभागातला एकमेव ब्रँड आहे. हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सनाच दिला जातो
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language