क्रेडिट कार्डने वारेमाप खर्च केल्यानंतर या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न उभा राहतो. ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशा परिस्थितीत मदतीला येते ते क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज....
....
आजकाल क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे आधी न देता खरेदी करता येते. नंतर ते पैसे भरायचे असतात; मात्र ही भलीमोठी रक्कम फेडताना अनेकदा कार्डधारकांच्या नाकी नऊ येतात.
ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशावेळी मदतीला येते ते क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज.
नव्या जमान्यातल्या फिनटेक कंपन्यांनी या गरजेसाठी कर्ज द्यायला सुरुवात केली आहे. क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज हे लघुकर्ज असून, त्या अंतर्गत ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.
या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारण बारा महिन्यांचा असतो. क्रेडिट कार्डच्या उर्वरित रकमेवर अधिक व्याजदर आकारला जातो; मात्र क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज १.५० टक्के व्याजदराने दिले जाते. त्यामुळे लाभदायी ठरते, मात्र ते वेळेत फेडणे आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर मर्यादा राखणे गरजेचे आहे.