नमस्कार सज्जनहो,
श्री समर्थांचे 205 मनाचे श्लोक
महाराष्ट्रात माहिती नाहीत अशी घरेफारच कमी असतील.
कदाचित ते तोंडपाठ नसतील पण माहितीनाहीत ही शक्यता फार कमी.
त्यामुळे, त्यातील प्रत्येक श्लोकावर ' निरूपण ' करीत साधारण गेले वर्षभर समर्थ भक्तसमीर शशिकांत लिमये, कल्याण , हे ' मनकीर्तन ' नावाची एक व्हिडिओ मालिका च करीत होते🙏
आणि
whats app, you tube च्या माध्यमातून साधारण 4000 च्या आसपास लोकांपर्यत पाठवत होते🙏
बघता बघता श्री समर्थ कृपेने ते ' मनकीर्तन ' श्रोत्यांस आवडू लागले आणि नंतरश्रद्धेय लोकांची ती मानसिक गरज बनू लागली🙏😊
मनकीर्तन ह्या मलिकेस श्रोत्यांचेप्रेम किती लाभावे?
तर,
डोंबिवलीच्या सौ रेखा जोशी, सौ नीता बाक्रे आणि ठाण्याच्या सौ वंदना भोजने, ह्या तिघींनी समीर लिमये ह्यांचे व्हिडीओ ऐकून ऐकून आपल्या वहीतलिहून काढले आणि त्या वह्या समीर लिमये ह्यांस नेऊन दिल्या🙏🚩😊
आज हे निरूपण पुस्तक रुपात आणताना त्यावह्यांचा खूप उपयोग झाला आणि त्या तिघींची छान समर्थ सेवा घडली🙏 त्यांचे खुप कौतुक आणि आभार🙏
बघता बघता मनकीर्तन मालिकेचे 200 भाग आज होत आहेत🙏आणि त्यात 205 श्लोकांचे निरूपण आहे🙏🚩
मनाचे श्लोक हे साधारणतः
3 भागात अभ्यासिले जातात.
1 ते 66 श्लोक हे कर्मपर आहेत
67 ते 131 उपासनापर आहेत
आणि
132 ते 201 ज्ञानपर आहेत.
201 ते 204 ज्ञान दृढ
करण्यासंबंधी आहेत
आणि
205 हा श्लोक फलश्रुती चा आहे🙏
हल्लीच्या तरुण पिढीस ' उच्चार आणि विचार ' असा अभ्यास करता यावा म्हणून
' बुकगंगा पब्लिकेशनने ' मनकीर्तन भाग 1 - कर्मपर श्लोक' असतील असे पुस्तक प्रकाशित करण्याचेठरवले आहे🙏😊
समर्थ भक्त समीर शशिकांत लिमये ह्यांचेअत्यन्त साध्या सहज मराठी भाषेत केलेले निरूपण
' बुकगंगा ' पुस्तक स्वरूपात लवकरात लवकर आणीतआहोत.
' बुकगंगा, पुणे ' चे मंदार जोगळेकर, सुप्रिया लिमये आणि गौरी जोशी हेपुस्तक प्रकाशित करून समीर लिमये आणि धनश्री नानिवडेकर ह्यांच्यासह समर्थ प्रचारकार्यास हातभार लावीत आहेत🙏🚩
जास्तीत जास्त तरुणांनी हे अभ्यासावे, सायकॉलॉजी चा अभ्यास करणाऱ्या तरुण मुलांना सुद्धा ह्या पुस्तकाचा उपयोग होईल अशी अपेक्षाआहे🙏