Ad will apear here
Next
‘नक्षलवादाचा बिमोड लोकशाही मुल्यानेच शक्य’
डॉ. प्रशांत दिघे यांच्या ग्रंथांचे प्रकाशन करताना साहित्यिक डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. रमेश बिजवे, डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, डॉ. सतीश कुळकर्णी, ललिता पुराणिक, प्रा. वृषाली जगताप व डॉ. प्रशांत विघे.अमरावती : ‘नक्षलवादांच्या प्रश्नांचा आपण फार विचार करत आहोत; परंतु नक्षलवादाने लक्ष वेधलेल्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. ते प्रश्न म्हणजे भूक, बेकारी, दारिद्र्य, नोकरशाहीचा जुलूम हे होय. नक्षलवाद हे भारतीय अव्यवस्थेचे देणे आहे. त्यांचा बिमोड करायचा असेल, तर भारतीय राज्यघटनेतील मुल्यांचा आधार घ्यावा लागेल व सामाजिक, आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल,’ असे प्रतिपादन साहित्यिक  आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोष मंडळाचे सदस्य डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी केले.

प्रा. डॉ. प्रशांत विघे लिखित ‘नक्षलवादी चळवळीचा विकास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी’ तसेच ‘भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम भारतीय महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ. रमेश बिजवे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यामंदिरचे सरचिटणीस डॉ. सतीश कुळकर्णी, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, अनंत सोमवंती, साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक उपस्थित होत्या.

डॉ. सोलापुरे पुढे म्हणाले, ‘प्रतिक्रियावादी स्वरूपात विकसित झालेला नक्षलवाद सामुहिक हिंसेचे समर्थन करतो. अहिंसावादी बुद्धांच्या देशात हिंसाचाराचा उद्रेक घडविला जत आहे; परंतु हिंसा आणि अराजकता हे अन्यायाने परीमार्जीत करण्याचे साधन होऊ शकत नाही. लोकशाही ही अधिकाधिक लोकशाहीत येऊन मिळावी लागते. यावर विचार झाला पाहिजे, तरच नक्षलवादाचा विकास रोखता येईल, अशी मांडणी करणाऱ्या दोन ग्रंथांचे लेखन डॉ. प्रशांत विघे यांनी केले आहे. ज्यामुळे नक्षलवादाकडे व भारतीय राज्यघटनेकडे नव्या दृष्टीने पाहणे शक्य झाले आहे.’

‘डॉ. विघे यांचे भारतीय राज्यघटनेचे पुस्तक हे भारतीय राज्यघटनेची मूल्य रुजविण्यात यशस्वी होणार आहे. राज्यघटनेचा समकाळातील अभ्यास अधिक प्रभावीपणे करणे अत्यावश्यक आहे,’ असे मत डॉ. तेलगोटे यांनी मांडले.

डॉ. सतीश कुलकर्णी यांनी डॉ. विघे यांनी संक्षिप्त स्वरूपात दोन मोठे विषय अभ्यासल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या पुस्तक निर्मितीचे विश्लेषण करताना आपल्या लेखन प्रवासाला उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ प्रकाशनच्या प्रकाशक ललिता पुराणिक यांनी केले. प्रा. स्वाती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संतोष बनसोड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र उमेकर,  डॉ. ज्ञानेश्वर यावले, डॉ. दीपक राऊत, डॉ. आशिष काळे, डॉ. गोविंद तिरमनवर, डॉ. वामन गवई, प्रा. मनीष चोपडे, डॉ. अनिल वानखेडे, डॉ. नितीन चांगोले, दिनेश जामनिक, प्रा. राहुल रडके, डॉ. आकाश मोरे, डॉ. अतुल वानखेडे, मयूर देवहाते, प्रा. प्रशांत ठाकरे आदींनी मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZPQBF
Similar Posts
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर येथे होणे अत्यंत आवश्यक’ परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा वेळेवर मिळत नसल्याने अमरावतीसारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील
शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेला मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाला.
शेतकरी उभे करणार बिगरराजकीय आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश पोहोरे, विजय जावंधिया, देवेंद्र शर्मा यांनी जेलभरो आंदोलन करायचे ठरविले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे बिगरराजकीय आंदोलन उभे करण्यात आले आहे. ‘बिगरराजकीय आंदोलन उभे झाले, तर सरकारदेखील सहानुभूतीने विचार करू शकते. शेतकऱ्यांनी
प्रवीण पोटे-पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद अमरावती : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यादरम्यान, अचलपूर तालुक्यातील परतवाडा इथे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना व त्यांचा लाभ, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language