Ad will apear here
Next
श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत संपूर्ण कोंडगावात आर्सेनिकम अल्बमचे वाटप


कोंडगाव (साखरपा) :
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत खबरदारीचा उपाय म्हणून आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप संपूर्ण कोंडगावमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. आदाते ह्यांना व त्यांच्या संपूर्ण स्टाफला गोळ्या देऊन नुकतीच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या वेळी भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुका संघटन सरचिटणीस व कोंडगाव येथील श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष अमित केतकर, पतसंस्थेचे संचालक डॉ. विद्याधर केतकर आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. उदय पोंक्षे उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZOSCM
Similar Posts
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?
कोंडगाव येथे अकौंटन्सीचे मोफत मार्गदर्शन वर्ग कोंडगाव (साखरपा) : येथील श्रीराम देवस्थान आणि रत्नागिरी येथील उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मे महिन्यात कोंडगाव श्रीराम मंदिरात कॉमर्स शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान साखरपा (रत्नागिरी) : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) आणि कोंडगाव येथील श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडगाव येथे स्मशानभूमी स्वच्छता आणि दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त आणि कोंडगावचे नूतन सरपंच बापूसाहेब शेट्ये, सदस्य मितेश गांधी आणि नेत्रा शिंदे उपस्थित होते
कोंडगावात रंगले ‘आनंदाचे रंग’ साखरपा : नोकरी-व्यवसायासाठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, तरी आपल्या मूळ गावाशी त्याची नाळ जुळलेली असते. म्हणूनच कारणपरत्वे तो पुन्हा आपल्या गावी जात असतो आणि आपल्या गोतावळ्यातील माणसांच्या भेटीगाठी घेत असतो. गावागावांत होणारे उत्सव म्हणजे तर अशा भेटीगाठींसाठी चांगले निमित्तच. रत्नागिरीच्या संगमेश्वर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language