Ad will apear here
Next
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त जनजागृती
पुणे : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात भारती विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताला विविध वस्तूंची पेटंट मिळवून देणारे प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांचे या वेळी त्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

त्या वेळी बोलताना हिंगमिरे म्हणाले, ‘मानवी बुद्धीतून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा हक्क संघटनेची स्थापना झाली आणि सन २०००पासून दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा हक्क दिन साजरा केला जात आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, भौगोलिक निर्देशन (जी आय मार्क) इंडस्ट्रियल डिझाइन या माध्यमातून बौध्दिक संपदेचे रक्षण केले जाते. जागतिक पातळीवर या संपत्तीला मान्यता, प्रसिद्धी मिळावी. ही संपत्ती निर्माण करणाऱ्याला त्याचे कष्टाचे फळ मिळावे यासाठी हा दिन साजरा केला जातो.’ 

 ‘भारताने बौद्धिक संपदाविषयक अनेक करार स्वीकारले आहेत. जगभरात १९० देश जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे सभासद असून, भारतानेही सदस्यत्व स्वीकारले आहे. भारत, चीन हे विकसनशील देश असून, भारतापेक्षा चीनने पेटंट घेण्यामध्ये आघाडी घेतली आहे. पेटंटसाठी चीनने विशेष आर्थिक तरतूदही केली आहे. भारतही आता त्या दिशेने पाऊल टाकत असून, याबद्दल तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्न करत आहे’, असेही हिंगमिरे यांनी सांगितले. 

भारती विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. सपना देव म्हणाल्या, ‘भारती विद्यापीठाचा स्थापना दिन आणि बौद्धिक संपदा दिन एकाच दिवशी असतो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बौद्धिक संपदा म्हणजे काय, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादीबाबतची कायदेशीर प्रक्रिया कशी असते, काय नियम आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, याकरता आम्ही व्याख्यान, चर्चासत्र आणि रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.’ 

(बौद्धिक संपदा तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZJNBZ
 Plenty of their literature was rescued from Central Asia, now stored ind
libraries , mainly in the West . Now , of course , it is of interest to
specialists . How many are interested in abstract philosophy ?
Similar Posts
बौद्धिक संपदा हक्क यादीत भारत ३६व्या स्थानावर वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्क यादीत ५० देशांच्या यादीत भारताने ३६ वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या ४४ व्या क्रमांकावरून यंदा भारताने तब्बल आठ स्थानांची आघाडी घेतली आहे.
‘बौद्धिक संपदेबाबत भारतीयांनी सजग राहायला हवे’ पुणे : ‘भारतीय लोकांची बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत; परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी पेटंट आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा,
ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान पुणे : मेक्सिको सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ‘ऑर्डेन मेक्सिकाना दे अॅग्विला अॅलझटेका’ हा पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना नुकताच पुण्यात एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांनी पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language