Ad will apear here
Next
वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी हिमायतनगरमध्ये महायज्ञ
हिमायतनगर : समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे मराठवाड्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात येथे पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जुलै ते २७ जुलै या काळात हा महायज्ञ होणार आहे. त्या वेळी एक लाख झाडेही लावण्यात येणार आहेत.

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दररोज सकाळी नऊ ते १२ या कालाधीत महायज्ञ होणार असून, दररोज दुपारी भजन आणि कीर्तनाबरोबरच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नागेश पाटील-आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक लाख झाडेही लावण्यात येणार आहेत. 

या कार्यक्रमात ११ यज्ञकुंड असतील. ३०० जोडपी दररोज यज्ञास बसणार आहेत. या कार्यक्रमासाठी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आष्टीकर, श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष व हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMZCC
Similar Posts
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचा प्रचार वेगात हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बोरगडी तांडा येथील रस्त्याचे सात मार्चला भूमिपूजन हिमायतनगर : ‘स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मौजे बोरगडी ते बोरगडी तांडा एक व दोन यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून मंजूर झाला असून, या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सात मार्च २०१९ रोजी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती शिवसेना
पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकाराची सांगता मुसळधार पावसाने हिमायतनगर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही हिमायतनगर तालुक्यात पाऊस झाला नसल्यामुळे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रेरणेतून हदगांव-हिमायतनगर मतदारसंघात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता २७ जुलैला मुसळधार पावसाने झाली.
हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना हिमायतनगर : शहरातील पाच शिवसैनिक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता हिमायतनगर येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदिर बांधकामाच्या मागणीसाठी शिवसैनिक अयोध्येत जमणार आहेत. त्यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक रामभाऊ ठाकरे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language