Ad will apear here
Next
१० जुलैला ऑनलाइन लोकशाही दिन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी, १० जुलै, २०१७ रोजी  सकाळी ११ वाजता ऑनलाइन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात हा कार्यक्रम होणार आहे.

मंत्रालय लोकशाहीदिनी ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाही दिनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष निवेदन मांडण्याकरिता प्रवेश देण्यात येईल.

मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात दिनांक १० जुलै, २०१७ रोजी सकाळी पावणे ११ वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशा अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZSSBE
Similar Posts
नाट्य निर्माता क्रीक डू सोलेएल नोव्हेंबरमध्ये मुंबईत मुंबई : जगातला सर्वात मोठा नाट्य निर्माता क्रीक डू सोलेएल यांनी मुंबईत त्यांची कला सादर करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भारताची मनोरंजन राजधानी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. भारतातील त्यांचे पहिले सादरीकरण येत्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणार आहे.
विकास आराखड्यास मान्यता मुंबई : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी श्री संत सेवालाल महाराज, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव येथील श्री मुंगसा महाराज समाधी स्थळही तीर्थक्षेत्रे आणि साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण स्मारक व सांगलीतील येडेनिपाणी येथील स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील स्मारक या स्मारकांच्या विकास
‘ज्ञान सतत अद्ययावत करत राहिले पाहिजे’ मुंबई : ‘विविध क्षेत्रांत काम करत असताना आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते असे असले तरी प्रत्येक व्यक्तीने नेहमीच आपले ज्ञान अद्ययावत करत राहिले पाहिजे,’ असे मत विश्वास पाठक लिखित ‘विश्वासमत’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांची मदत मुंबई : ‘शेतकरी कायम कर्जमुक्त राहावा, यासाठी महाराष्ट्र सरकार शाश्वत शेतीवर भर देत आहे. याकरिता उद्योगांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत, ‘हर्मन फिनोकेम लिमिटेड’चे भूपिंदरसिंग मनहास यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language