Ad will apear here
Next
‘प्रत्येक प्रॉब्लेमला आहे सोल्यूशन’ असं सांगणारी नवी मालिका ‘वैजू नंबर वन’


ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद... टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठे तरी हरवत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर, धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येतेय ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘वैजू नंबर वन.’ 

खरं तर आयुष्यात आपण प्रत्येक जण खूप सारी स्वप्नं पाहत असतो. काही जणांची स्वप्नं पूर्ण होतात. काही मात्र आयुष्यभर या स्वप्नांचा पाठलाग करत रहातात. ‘वैजू नंबर वन’ मालिकेतली वैजू स्वप्नाळू आहेच; पण प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा मजेशीर मार्गही तिच्याकडे आहे. साताऱ्यात वाढलेल्या वैजूला पोलिस सेवेत जाण्याची इच्छा होती. काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही; मात्र पोलिस खात्यातील मुलाशी लग्न करुन तिने ती पूर्ण करून घेतली. 

साताऱ्याहून मुंबईतल्या ‘तिसरी मंजिल’ चाळीत आल्यावर तिने आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांनाच आपलंसं करून घेतलं. प्रॉब्लेम कोणताही असो, वैजूकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्यूशन असतं. त्यामुळेच संपूर्ण चाळीत ती नंबर वन ठरते.

‘तिसरी मंजिल’ चाळ नावाप्रमाणेच थोडी फिल्मी आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली मंडळी या ‘तिसरी मंजिल’मध्ये अगदी गुण्यागोविंदाने राहतात. टोलेजंग इमारतींच्या शहरात चाळ संस्कृती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चाळ हा प्रत्येकाच्या मनातला असा एक हळवा कोपरा आहे, ज्याच्या आठवणी पुसणं हे केवळ अशक्य आहे. वैजू नंबर वन मालिकेतलं हे २२ खोल्यांचं कुटुंब नक्कीच निखळ मनोरंजन करील. दैनंदिन आयुष्यतल्या घडामोडी मजेशीर पद्धतीने या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येतील.

वैजू नंबर वन मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘वैजू नंबर वन ही एक हलकीफुलकी आणि आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट आहे. अतिशय प्रेमळ आणि रोजच्या जीवनात होणाऱ्या गोष्टींशी निगडित असलेली कथा, धकाधकीच्या आयुष्यात तुमचं टेन्शन विसरायला लावेल अशी ही मालिका आहे.’

सोनाली पाटील ही नवोदित अभिनेत्री वैजू शिर्केची भूमिका साकारत असून, समीर खांडेकर वैजूच्या पतीच्या म्हणजेच सुशील शिर्केच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ईला भाटे, अविनाश नारकर, मिहिर राजदा, प्रभाकर मोरे, संजीवनी जाधव, श्रीजित मराठे, नीता पेंडसे, संजय कुलकर्णी, भरत सावले, मीनल बाळ अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत दिसणार आहे. होलाका क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली असून, संजय जाधव, प्रोमिता जाधव, हर्षदा खानविलकर आणि दीपक राणे या मालिकेचे निर्माते आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.

‘वैजू नंबर वन’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYWCK
Similar Posts
वहिनी ही लाडाची... ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या युगात एकत्र कुटुंबपद्धतीचं महत्त्व या मालिकेतून दाखवले जाणार आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद
रामानंद सागरांचं ‘रामायण’ मराठीतून पाहता येणार... ११ जूनपासून! मुंबई : रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ ही पौराणिक मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली होती, तेव्हा रस्ते ओस पडायचे. यंदा लॉकडाउनच्या काळात दूरदर्शनवरून ती पुन्हा प्रसारित करण्यात आली, तेव्हाही त्या मालिकेने प्रेक्षकसंख्येचा उच्चांक गाठला. आता ही मालिका प्रथमच टीव्हीवर मराठीतून प्रसारित होणार आहे.
आयुष्यात मिळालेली दुसरी संधी अत्यंत महत्त्वाची : राहुल देशपांडे ‘स्टार प्रवाह’वर १२ जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी दुपारी १२ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे हे कलाकार या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत असून, अभिनेते पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या निमित्ताने, सुप्रसिद्ध गायक
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language