Ad will apear here
Next
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातर्फे ५६ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया
पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, तसेच लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीर व परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ५६ रूग्णांवर तिरळेपणा घालवण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. पारस शहा, डॉ. राजेश पवार यांच्या गटाने या शस्त्रक्रिया केल्या. या वेळी डॉ. एन. जे. पवार, डॉ. गुणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, विभाग प्रमुख व आयोजक डॉ. नीलिमा अमृते, ओमप्रकाश पेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ. स्मिता जाधव यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांचा व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयातील सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXGCG
Similar Posts
जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिर पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयातर्फे जागतिक मूळव्याध दिनानिमित्त ११ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर होणार आहे.
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ची अंतिम फेरी सोमवारी पुणे : व्हाइट डिव्हाइन इव्हेंट्स आणि डॉक्टर ऑन कॉल बाय पिनॅकल ग्रुप यांच्या वतीने आयोजित ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी येत्या सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता नवले लॉन्स येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात ‘डॉक्टर ऑन कॉल’ या मोबाइल अॅपचे उद्घाटनही होणार आहे,’ अशी माहिती संयोजिका व्हाइट डिव्हाइनच्या संस्थापक डॉ
फिक्की फ्लोतर्फे पाचव्या पुणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन पुणे : ‘फिक्की फ्लो’च्या वतीने रविवार, आठ डिसेंबर रोजी पाचव्या पुणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अर्बन टू रूरल’ या मध्यवर्ती संकल्पनेसह समाजातील सर्व स्त्रियांना सक्षम, समृद्ध आणि सहभागी करून घेण्यासाठी ही मॅरेथॉन समर्पित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम समाजसेवी क्रीडा व्यासपीठ म्हणून नावारूपाला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language