Ad will apear here
Next
‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना

पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. सेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील टंचाई आढावा बैठक तीन मे २०१९ रोजी पार पडली. त्या वेळी डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हानिहाय टंचाई निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. 

या वेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


या विषयी अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पावसाच्या कमतरतेमुळे या वर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. या कालावधीत पुणे विभागातील ६७७ गावे व चार हजार २५८ वाड्यावस्त्यांवरील १२ लाख ३८ हजार २५० लोक, तर तीन लाख ७५ हजार ८४४ इतके पशुधन बाधित झाले आहे. ही संख्या खूपच मोठी असून ४३ शासकीय व ७६१ खासगी असे मिळून ८०४ टँकर्सच्या माध्यमातून पुणे विभागात पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २११ गावे, तर एक ४१० वाड्या-वस्त्या बाधित आहेत. सातारा जिल्ह्यात तीन लाख १८ हजार ६५८ आणि सांगली जिल्ह्यातील ५४ हजार १८६ पशुधन बाधित आहे.’

पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधण विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे या उपायोजना करण्यात येत आहेत. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्यक आहे; तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी या बैठकीत दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZYECA
 It is important to take immediate steps . How about the underlying
problems ? They have to identified . This may take prolonged study ,
and investment which may not show quick returns . Indeed , they
may be intangible . So what ? Can everything be measured in terms
of money ?
Similar Posts
‘सात-बारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे’ पुणे : ‘पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे,’ अशा सूचना महसूलमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पाच जुलैला झाली
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन पुणे : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा येथे करावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत विजेते पुणे : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई इंडिया) ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ निर्मितीची ‘एसएई तिफण २०१९’ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी गौरविण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language