Ad will apear here
Next
आषाढसरींसोबत रंगला ‘गान-रस-रंग’ कार्यक्रम
गान-रस-रंग कार्यक्रमात गाणी सादर करताना अभिजित वाडेकर, वृषाली मावळंकर

पुणे : आषाढसरींच्या सोबतीने उपशास्त्रीय संगीत, अभंगापासून ते गझल, लावणी, कव्वाली, देशभक्तीपर गीते अशा विविध रचनांच्या बरसातीने ‘गान-रस-रंग’ हा कार्यक्रम रंगला.

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, २६ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात ‘गान-रस-रंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वृष स्वर’ प्रस्तुत या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण रचनांना रसिकांची भरभरून दाद मिळाली.   

अभिजित वाडेकर, वृषाली मावळंकर यांनी गाणी सादर केली. प्रसन्न बाम (हार्मोनियम), अभय गाडगीळ (की-बोर्ड), समीर बंकापूरे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. रंजना काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZGVCC
Similar Posts
भारतीय विद्या भवनमध्ये बुधवारी नृत्योत्सवाचे आयोजन पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने बुधवार, दि. २८ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता नृत्योत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात रंगणार सुगम, चित्रपट संगीताची मैफल पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत चारूशीला गोसावी प्रस्तुत ‘व्हायोलिन गाते तेव्हा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे.
पुण्यात ‘गोंदण शब्दांचं’ कार्यक्रम सादर पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने शांता शेळके यांच्या गीतांवर आधारित ‘गोंदण शब्दांचं’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अनन्वय संस्थेने सादर केला.
‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगणार मंगळागौरीचे खेळ पुणे : ‘‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘मंगळागौर खेळ’ कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language