Ad will apear here
Next
भविष्य घडवण्यासाठी ‘ती’ मुलं वाचतायत...


रत्नागिरी :
‘नवीन पिढी स्वीकारायला तयार आहे; पण त्यांच्यापर्यंत योग्य ते शिक्षण पोहोचत नाही,’ अशी खंत रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांना वाटते. म्हणूनच ही परिस्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा म्हणून त्यांनी ‘उघड्यावरचे ग्रंथालय’ (ओपन लायब्ररी) हा उपक्रम झोपडपट्टीतील मुलांसाठी रत्नागिरीत वर्षभरापूर्वी सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमांतर्गत डॉ. निधी पटवर्धन यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

डॉ. निधी पटवर्धनत्या म्हणाल्या, ‘मला लहान मुलांमध्ये रमायला आवडते. त्यांना विकसित होताना पाहायला आवडते. रोज सकाळी मी चालायला जाते. त्या वेळी भाट्ये येथील झोपडपट्टीतील मुले खेळताना, इकडे-तिकडे फिरताना दिसायची. त्यांच्याकडे बघून नेहमी वाटायचे, की यांची ऊर्जा सकारात्मक कामी आली, तर किती बरे होईल. याच उद्देशाने तीन मे २०१७पासून हा उपक्रम मी सुरू केला. सुरुवातीला मी मुलांना उपयोगी पडतील अशी घरातील जुनी पुस्तके देण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप पुस्तके जमा झाली. तिथे पुस्तक घेऊन गेल्यानंतर समजले, की उर्दू माध्यमाची मुले जास्त आहेत. मग त्यांच्यासाठी काही उर्दू पुस्तके खरेदी केली; तसेच रविकांत देवगडकर यांनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या (एनबीटी) माध्यमातून काही पुस्तके उपलब्ध करून दिली. आता सुमारे ४०० पुस्तके आमच्याकडे आहेत. या मुलांना अनंत भावेंच्या कविता खूप आवडतात. त्यातल्या काही कविता त्यांनी पाठही केल्या आहेत. ही मुले निसर्गाची प्रार्थना म्हणतात. यातली काही कुटुंबे कर्नाटकातून इथे आलेली आहेत. ही कुटुंबे हातावर पोट असलेली असल्याने ती काही काळ इकडे, तर काही काळ कर्नाटकात असतात; पण इथे शिकतात. त्यांना विकसित होताना मी पाहते. त्यांना निबंध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला. ‘वयम्’च्या व्यक्तिमत्त्व स्पर्धेत भाग घायला लावला. त्यांची कणाकणाने होत असलेली प्रगती पाहून मन सुखावते.’

‘महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील मराठी भाषेतील वाढती अनास्था पाहून मुंबई विद्यापीठातर्फे कला शाखेच्या प्रथम वर्षाला मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचे नियम अभ्यासात अंतर्भूत करण्यात आले आहेत. हल्लीची मुले नियम शिकवल्यानंतरही प्रमाण लेखन करत नाहीत. अशुद्ध मराठी लिहितात-बोलतात. म्हणूनच मुलांना शालेय वयापासूनच मातृभाषेबद्दल सजग करायला हवे. त्यांना मराठी माध्यमातूनच शालेय शिक्षण द्यावे, यासाठी मी आग्रही आहे’, असेही त्यांनी सांगितले.
‘मुलांना शालेय वयापासूनच मातृभाषेबद्दल सजग करायला हवे. यासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे असे माझे मत आहे. इंग्रजी माध्यमात शिकल्याने मुलांना बोलण्यापुरतीच मराठी कळते. घरात बोलण्याची भाषा मराठी आणि शिक्षण इंग्रजीतून यामुळे ही मुले बोलताना भाषेची सरमिसळ करताना दिसतात आणि हे चित्र हल्ली सर्रास बघायला मिळते. अर्थात, काही मुले इंग्रजी माध्यमात शिकत असूनही स्वतःची भाषा विकसित करतात; मात्र तरीही त्यांच्याकडून अनेकदा चुकीचे मराठी बोलले-लिहिले जाते. मुलांना इतर बाबतीत संस्कारित करण्याबरोबरच भाषेच्या बाबतीत समृद्ध करणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचेही कर्तव्य आहे. आताचे पालक करिअरमध्ये व्यग्र असल्याने मुलांवर भाषेचे संस्कार करण्यासाठी त्यांना वेळ किती मिळत असेल याबद्दल मी साशंकच आहे,’ असेही डॉ. पटवर्धन म्हणाल्या.
संपर्क : डॉ. निधी पटवर्धन - ९४२१४ ३९६६४

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZYQBM
 Gargi & Girish Very good initiative no one ever think about it in our own country about our own culture & mother toung, our old games but you have done it in far beyond India it's creditable Pls do continue all the best for your future projects.1
Similar Posts
‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’ रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांची भूमिका स्पष्ट केली. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी - मराठीचे अलौकिक शब्दलेणे! शब्दशक्तीचं सामर्थ्य, त्यातल्या अर्थच्छटांची सूक्ष्म जाण, बुद्धिमत्ता आणि तरल कल्पनाशक्ती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी. गोविंदाग्रजांनी मराठी वाङ्मयाला, समृद्ध, श्रीमंत केलं आहे आणि हे आपणा सर्व रसिकांसाठी अमूल्य असं शब्दलेणं आहे. २६ मे हा गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language