Ad will apear here
Next
अजि म्या परदेस पाहिला
परदेशवारी हे अनेकांचे स्वप्न असते. आता ते पूर्ण आवाक्यातही आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी देवगोजी यांना त्यांच्या चुलत बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला. तिथे २२ दिवसांतील वास्तव्यातील आठवणी त्यांनी ‘अजि म्या परदेस पाहिला’मधून कथन केल्या आहेत. पुस्तकातून वाचलेला, चित्रपटांतून पाहिलेला निसर्गरम्य स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.

गोव्यात विमानतळावर आल्यापासून स्वित्झर्लंडपर्यंतच्या प्रवासाने सुरुवात होते. सेंट गालन येथे राहणाऱ्या ताईच्या घरी गेल्यावर तेथील गोष्टींचे अप्रूप, राजहंसांच्या पिसांच्या पांघरुणाची गमंत, भोवतालचा निसर्ग, राजहंसाचे प्रत्यक्ष दर्शन यात आहे. पुतणी कुमुद व तिची कलाकार मैत्रीण बिनिता यांचा सहवास, तेथील शिस्तीचे लोकजीवन, लागो मॅजिओरे नदी, मोंटे सॅन साल्वातोर, ऱ्हाईन नदीची सफर, चीजची फॅक्टरी, ताईच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत तेथील लोकांच्या रिती, परंपरेची ओळख त्यांना होते. या सर्वांचे वर्णन यात केले आहे.
      
पुस्तक : अजि म्या परदेस पाहिला
लेखक : विजयालक्ष्मी देवगोजी
प्रकाशक : अमरल प्रकाशन
पाने : १६८
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZYMBY
Similar Posts
‘अजि म्या परदेस पाहिला’ पुस्तकाचे प्रकाशन लांजा : आधी अगदी हिमालयही न पाहिलेल्या एका स्त्रीला थेट स्वित्झर्लंडमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तेथील बर्फाच्छादित जगाची २२ दिवस सफर करता आली, तर तिचे अनुभव किती अविस्मरणीय असतील ना! लांजा (जि. रत्नागिरी) येथील विजयालक्ष्मी देवगोजी यांना अशी संधी मिळाली. त्यांनी घेतलेले मनोहारी अनुभव केवळ स्वतःपुरते
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
सुखी माणसांचा देश भूतान आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language