मुंबई : ‘शेतकरी कायम कर्जमुक्त राहावा, यासाठी महाराष्ट्र सरकार शाश्वत शेतीवर भर देत आहे. याकरिता उद्योगांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत, ‘हर्मन फिनोकेम लिमिटेड’चे भूपिंदरसिंग मनहास यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनहास यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा, अशी इच्छा मनहास यांनी व्यक्त केली. बळीराजाच्या मदतीसाठी मनहास यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.