Ad will apear here
Next
‘ट्रिनिटी’च्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखांचे पॅकेज
पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ७० लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे, तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी विपुल कदम याला मलेशिया येथे कॅपजेमिनी कंपनीत १८ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण, विभागप्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी मेहनत घेतली आहे. 

संगणक अभियंता असलेल्या अमरजितने ट्रिनिटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. केजे शिक्षण संस्थेने अमरजित याला ‘जीआरई’ व ‘टोफेल’ या परीक्षांची तयारी करण्यासाठी, तसेच अमेरिकेत मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स (एमएस) करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसाह्य पुरवले होते. विपुलने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. सुहास खोत यांनी दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

संस्थाध्यक्ष कल्याण जाधव म्हणाले, ‘केजे शिक्षणसंस्था इन्फोसिस, विप्रो, पर्सिस्टेंट, झेन्सार, एक्सेंचर, सायबेज यांसारख्या १०० पेक्षा अधिक बहुराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्यांशी संलग्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. या कंपन्यांच्या माध्यमातून कॅम्पस प्लेसमेंट्स होतात. समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षभरात संस्थेतील ४५० विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली आहे, ही गोष्ट आम्हाला प्रोत्साहित करणारी आहे.’ 

प्रा. प्रतिभा चव्हाण म्हणाल्या, ‘अमरजितची अभ्यासामधील गती पाहून त्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी, यासाठी संस्थेकडून सतत साह्य करण्यात आले. ‘ट्रिनिटी’मध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी प्रथम वर्षापासूनच मार्गर्शन केले जाते. व्यक्तिमत्व प्रशिक्षण, कौशल्याचे शिक्षण, क्रीडा यांसह ग्रॅव्हिटी, गोकार्ट, रोबो-वॉर यांसारख्या स्पर्धा घेण्यात येतात. आज संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी अमरजित आणि विपुल यांच्याप्रमाणेच अनेक नामांकित कंपन्यांंत कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZRWCC
Similar Posts
केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा पुणे : ‘विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत ‘सावित्रीबाई फुले
कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार पुणे : येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ आणि ‘केजे इन्फ्रा’चे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘नवभारत इन्फ्रा कॉनक्लेव्ह अँड अवार्ड’ कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कल्याण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
केजे कॅम्पसमध्ये इन्फोसिसची भरती प्रक्रिया पुणे : येवलेवाडी येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ या संस्थेमार्फत अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तीन हजारपेक्षा अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’ या अग्रणी कंपनीच्या वतीने केजे शिक्षणसंस्थेत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये देशभरातून तीन हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी लेखी व मौखिक परीक्षा दिली
‘समतोल साधणारा अर्थसंकल्प’ ‘हा समतोल अर्थसंकल्प आहे. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, अॅनिमेशन या नव्याने विकसित होत असलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके बाहेरून आयात करावी लागतात. त्यावर लावण्यात येणारे आयात शुल्क योग्य नाही. अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळेल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language