Ad will apear here
Next
देशभरातील खाद्य-संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी
३० व ३१ मार्चला पुण्यात ‘के टू के कार्निवल’

पुणे : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना त्यांच्या शहरात उपलब्ध झाली आहे. शनिवार, ३० मार्च आणि रविवार, ३१ मार्च असे दोन दिवस ‘के टू के कार्निवल’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतची खाद्यसंस्कृती आणि त्याबरोबरच कला, संगीत, नृत्य, परंपरा यांचाही लोकांना अनुभव घेता येणार आहे. ‘स्वामी समर्थ ग्रुप’च्या ‘समर्थाज इव्हेंट्स’द्वारा औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील धनकुडे लॉन्स येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


‘पुणे हे आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर असल्याने देशभरातून लोक येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने येतात. त्यांना त्याच्या प्रांताची चव येथेही चाखता यावी, आपल्या मातीची अनुभूती पुण्यात राहूनही घेता यावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात त्या त्या भागातील कला, फॅशन, हस्तकला, घरगुती पदार्थ, संगीत, लोकनृत्य अशी सर्वांगाने ओळख करून घेता येणार आहे. यात खाद्य विभागात प्रांतांनुसार पंजाब-हरियाणा-काश्मीर, गुजराथ-राजस्थान, बंगाल-आसाम-ईशान्य भारत प्रदेश, हैद्राबाद-केरळ-दक्षिण भारत, महारष्ट्र असे विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय खरेदी विभाग, लहान मुलांसाठी खेळण्याचा भाग आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी व्यवस्था करण्यात आली आहे,’ अशी माहिती संस्थेचे संचालक नरेंद्र पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, ‘सगळ्यांनाच संपूर्ण भारत फिरून तिथली संस्कृती अनुभवणे, पदार्थ चाखणे शक्य होतेच असे नाही. तसेच बरेच परप्रांतीय लोक पुण्यात येऊन स्थिरावले आहेत. त्यांना त्यांच्या प्रदेशाची आठवण येतेच. अशा सगळ्यांसाठी हा महोत्सव आहे. हा आमचा पहिला महोत्सव असून, पुण्यातील विविध ठिकाणी दर महिन्याला आठ कार्निवल भरविण्याची आमची योजना आहे’.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZJIBY
Similar Posts
‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ पुणे : ‘भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये;तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे;पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे,’ असे उद्गार सैन्यदलासाठी काम करणाऱ्या महिलांनी काढले.
‘महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी’ पुणे : ‘आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त| हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’ म्हणजे पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे. अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते त्या जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने कायमच पर्यटकांसह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक चित्रपट या पृथ्वीवरच्या नंदनवनात चित्रित झाले आहेत
‘काश्मिरी तरुणांशी संवाद साधणे महत्त्वाचे’ पुणे : ‘कलम ३७० रद्द केल्यांनतर आता जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी प्रभावी धोरण असणे गरजेचे आहे. योग्य राजकीय माध्यमे वापरून काश्मिरी तरुणांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन संवादातील दरी कमी करणे आता महत्त्वाचे ठरेल,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हूडा यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language