Ad will apear here
Next
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित
‘पीसीइआरएफ’चा यशस्वी प्रयोग
‘पीसीइआरएफ’कडून बांधकामातील काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी लागणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना (डावीकडून) डॉ. हेमंत धोंडे, संजय वायचळ, विश्वास लोकरे, श्रीकांत निवसरकर व व्ही. व्ही. बडवे.

पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे. ‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष विश्वास लोकरे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
संस्थेचे उपाध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष जयंत इनामदार, मानद सचिव नीळकंठ जोशी, तसेच या उपकरणाच्या विकसनात महत्त्वाची भूमिका बजावलेले डॉ. हेमंत धोंडे व डॉ. राजेश घोंगडे या वेळी उपस्थित होते. ‘पीसीईआरएफ’ ही ३५ वर्षे जुनी व विना नफा तत्त्वावर चालणारी संस्था असून, बांधकाम क्षेत्रातील नवीन आणि किफायतशीर तंत्रज्ञान या व्यवसायातील संबंधितांपर्यंत पोहोचवणे, या नवीन तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण देणे आणि उपयुक्त संशोधन करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. ‘पीसीईआरएफ’चे माजी अध्यक्ष श्रीकांत निवसरकर, व्ही. व्ही. बडवे यांचीही या वेळी उपस्थिती होती.


‘‘इंटेलिजंट काँक्रीट मॅच्युरिटी मीटर’ नावाचे हे उपकरण संपूर्णतः भारतीय बनावटीचे असून, ते थेट मोबाइलला जोडण्याजोगे आणि अगदी हाताच्या तळव्यावर मावेल इतके छोटे आहे. त्याचा वापर सोपा असून, खास भारतातील बांधकाम क्षेत्रातील अडचणींचा विचार करूनच त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या उपकरणाच्या वापरामुळे बांधकाम प्रकल्पाच्या खर्चात १० ते १२ टक्के बचत होणार आहे. सध्या परदेशी बनावटीचे मॅच्युरिटी मीटर किट तीन लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत मिळते. भारतीय मॅच्युरिटी मीटर किट साधारणतः ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करून देता येईल. भारतीय बनावटीच्या या उपकरणाला ‘इंडियन स्टँडर्ड कोड’ची मान्यता मिळावी यासाठी ‘पीसीईआरएफ’तर्फे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आतादेखील हा भारतीय मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यतांचे निकष पूर्ण करतो. या उपकरणाच्या पेटंटसाठीदेखील अर्ज करण्यात आला आहे,’ अशी माहिती लोकरे यांनी दिली.

‘पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीमध्ये काँक्रीटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काँक्रीटपासून घन व दंडगोलाकृती प्रतिकृती तयार करून तीव्र दाबाखाली त्यांचा मजबूतपणा मोजण्याची पद्धत वर्षानुवर्षे अवलंबली जाते. ही एक तोडफोडीची (डिस्ट्रक्टिव्ह) पद्धत असून, ती गुंतागुंतीची आणि वेळखाऊदेखील आहे. तिच्या अनेक मर्यादा असल्यामुळे काँक्रीटची खरी मजबुती यातून समजत नाही. त्यामुळे पुढे बांधकामाबद्दल अनेक समस्या उद्भवू शकतात. यावर उपाय म्हणून ‘मॅच्युरिटी मेथड’ ही दुसरी पद्धत गेली ३० वर्षे प्रामुख्याने परदेशात वापरली जात आहे. यात काँक्रीटचे तापमान अर्थात त्यातील ओलावा आणि काँक्रीट साच्यात ओतल्यानंतर झालेला वेळ मोजून त्यावरून काँक्रीटचा मजबूतपणा काढला जातो. ही पद्धत अधिक विश्वसनीय मानली जाते. भारतात मॅच्युरिटी मेथडचा वापर नगण्य आहे. आता देशात या पद्धतीचा अवलंब स्वस्त आणि सोपा व्हावा यासाठी ‘पीसीईआरएफ’ने बनवलेला ‘इंटलिजंट काँक्रीट मॅच्युरिटी मीटर’ काम करणार आहे. यामुळे कमी खर्चात अचूक प्रकारे काँक्रीटची मजबुती मोजता येईल. बांधकाम क्षेत्राला आणि पर्यायाने सामान्य माणसालाही याचा मोठाच फायदा होणार आहे,’ असेही लोकरे यांनी नमूद केले.

येत्या १६ ते १९ जानेवारी दरम्यान सिंचननगर येथील अॅग्रिकल्चरल कॉलेज ग्राउंडवर होणाऱ्या ‘कॉन्स्ट्रो’ या सोळाव्या द्वैवार्षिक प्रदर्शनात हे संशोधन सादर केले जाणार आहे. बांधकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि प्रकल्प या संबंधीचे सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून कॉन्स्ट्रो ओळखले जाते. ‘मेकॅनाइज्ड अँड इंटेलिजंट कन्स्ट्रक्शन’ ही या वर्षीच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZLDCH
Similar Posts
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
जागतिक बाजारपेठेतील सॉफ्टवेअर उत्पादनांचा भारताचा वाटा आठ बिलियन डॉलर्सचा पुणे : ‘सॉफ्टवेअर उत्पादनांचा जागतिक बाजार ५०० बिलियन डॉलरचा असून, त्यातील भारताचा वाटा जवळपास आठ बिलियन डॉलर्सचा आहे. येत्या २०२५ पर्यंत तो ७० ते ८० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार, विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून एकत्र येऊन पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language