Ad will apear here
Next
बैलगाड्यांच्या शर्यतींबाबत सरकार सकारात्मक
मुंबई : तमिळनाडू सरकारने जल्लिकटटू स्पर्धेबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही बैलगाडा शर्यतीवरची बंदी मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी राज्य सरकार विधेयक सादर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील दापोडी ते लोणावळा या पट्ट्यातील शेतकरी बैलगाडा शर्यतीबाबत नेहमीच उत्सुक असतात.  

बैलगाड्यांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीने बैलगाड्यांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याबाबत सविस्तर अभ्यास करून, आपला अहवाल विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. येत्या चार-पाच दिवसांत समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित कायदा करण्याची सरकारची तयारी राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VYUOBA
Similar Posts
आज मराठा क्रांती मोर्चातर्फे 'चक्काजाम' मुंबईत आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आतापर्यंतच्या मूक मोर्चांत मराठा समाजाने अहिंसा व संयम यांचा आदर्श जगाला घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने या आचारसंहितेचे पालन करूनच चक्‍काजाम आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले आहे
‘गिफ्ट डीड’बाबत निवेदन मुंबई : ‘भाजपचे सरकार आल्यावर रक्तातील नात्यांमध्ये गिफ्ट डीड करताना शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्य सरकारचे महसुलाचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. असे असतानाही सध्याही रक्तातील नात्यात गिफ्ट डीड करताना त्यावर स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा राज्य सरकारचा कुठलाही मानस
शरद पवारांची स्मार्ट खेळी; भाजपने चर्चेला यावे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईतील मेळाव्यात भाजपसोबतची युती तोडत आगामी काळात राज्यभरात एकट्याने भगवा फडकवणार असल्याची गर्जना केली. उद्धव यांच्या या घोषणेनंतर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, इतके वर्ष एकत्र असणारे पक्ष वेगळे झाले, या गोष्टीचे अतीव दु:ख झाल्याचे म्हटले
‘पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १०३ कोटींची कर्जमाफी’ पालघर : राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १५ हजार ६६६ कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांची तब्बल १०३ कोटी ६५ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, शेतकरी नेत्यांनाही धन्यवाद दिले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language