Ad will apear here
Next
वर्धापनदिनानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन
इस्लामपूर : आधार हेल्थ केअर सर्व्हिस सेंटरने वर्षभर केलेल्या आरोग्यसेवेची वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने सेंटरच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शुभमुहूर्तावर सेंटरच्या ‘आधार’ या  नवीन व सुसज्ज इमारतीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. सतीश गोसावी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. इस्लामपूरचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व विकास कोरे यांची वर्धापनदिनानिमित्त प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सिंधुताई सपकाळसिंधूताईंचे विचार ऐकण्यासाठी व हेल्थ केअर सेंटरच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. योगेश वाठारकर आणि टीम आधारतर्फे करण्यात आले आहे. 

स्थळ : आधार हेल्थ केअर, माणकेश्वर प्लाझा, माणकेश्वर चित्रमंदिराजवळ, पेठ - सांगली रोड, इस्लामपूर.
दिनांक : नऊ मे २०१७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZRZBC
Similar Posts
‘आरआयटी’मध्ये ‘ग्लोबल मीट’ इस्लामपूर : राजारामबा पू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘ग्लोबल मीट’ उत्साहात पार पडली. पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे २०० उद्योगपतींनी ‘राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आरटीआय) ‘ग्लोबल मीट’ या उपक्रमास हजेरी लावली. यातील अनेक उद्योजकांनी इन्स्टिट्यूटच्या दर्जाचे भरभरून कौतुक केले
पाटील, धोंगडे यांना बंधुता प्रतिष्ठानचा पुरस्कार पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बंधुता  पुरस्कारासाठी प्रा. एन. डी. पाटील व साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे यांची निवड करण्यात आली आहे. इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी पुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language