इस्लामपूर : आधार हेल्थ केअर सर्व्हिस सेंटरने वर्षभर केलेल्या आरोग्यसेवेची वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने सेंटरच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शुभमुहूर्तावर सेंटरच्या ‘आधार’ या नवीन व सुसज्ज इमारतीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. सतीश गोसावी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. इस्लामपूरचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व विकास कोरे यांची वर्धापनदिनानिमित्त प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सिंधूताईंचे विचार ऐकण्यासाठी व हेल्थ केअर सेंटरच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. योगेश वाठारकर आणि टीम आधारतर्फे करण्यात आले आहे.
स्थळ : आधार हेल्थ केअर, माणकेश्वर प्लाझा, माणकेश्वर चित्रमंदिराजवळ, पेठ - सांगली रोड, इस्लामपूर.
दिनांक : नऊ मे २०१७