Ad will apear here
Next
वनसंपदेसाठी ‘सीड्स बॉल’
सीड्स बॉलपुणे : येथील ‘दी सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल’ आणि ‘भवताल’ या संस्थांनी यंदा झाडे लावण्यासाठी ‘सीड्स बॉल’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक लोकांकडून बिया जमा करण्याचे काम करत आहेत. त्या बिया लवकरच ‘सीड्स बॉल’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.

माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी ‘बी’ घालून त्यातून ‘सीड बॉल’ म्हणजेच चिखलाचे गोळे तयार करण्यात येतात. त्यानंतर हेच ‘सीड्स बॉल’ शहराभोवतीच्या मोकळ्या परिसरात, टेकड्यांवर टाकले जातात. त्यातून झाडे रुजतात. या वेळी प्रायोगिक तत्त्वावर पाचशे ते हजार ‘सीड्स बॉल’ तयार करण्याचा दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांचा मानस आहे. यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यत आले आहे. २० ते २७ मे या कालावधीत पुण्यातील राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात सायंकाळी चार ते सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
याविषयी स्वयंसेवक इरावती बरसोडे म्हणाल्या, ‘या उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येईल. चिंच, कडुनिंब, हरडा, बेहडा अशा स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बियांपासून सीड्स बॉल तयार केले जातील. शेण आणि मातीमध्ये बी घालून स्वयंसेवक आणि हौशी नागरिकांच्या मदतीने त्याचे गोळे केले जातील. नुसत्या बिया मोकळ्या जागेत टाकल्यास, त्या पक्षी खाऊ शकतात किंवा बी उडून दुसरीकडे जाऊ शकते; मात्र ‘सीड्स बॉल’मुळे बी त्यात रुजण्यास आणि त्यातून रोपटे तयार होण्यास मदत होणार आहे. हे ‘सीड्स बॉल’ गिर्यारोहक, पर्यावरणप्रेमींनाही देण्यात येतील.’
...............
झाडांसाठी असाही उपक्रम

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील एका तरुणाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देण्यासाठी लग्नपत्रिकेबरोबर चक्क झाडांच्या बिया पाठवल्या आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. तो कायमस्वरूपी लक्षात राहावा, म्हणून सारे जण प्रयत्न करत असतात. त्याची सुरुवात लग्नपत्रिकेपासून होते. ती इतरांपेक्षा वेगळी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्याचप्रमाणे ही बिया पाठवण्याची संकल्पना आहे. खंडू शंकर काशिद आणि तेजस्विनी प्रकाश पापडे यांनी आपल्या लग्नाच्या पत्रिकेसमवेत अक्षतांऐवजी तुळस, गुलमोहर, अंजन, सीताफळ, रामफळ, चिंच, बाभूळ आदी विविध झाडांच्या बिया पाठवल्या आहेत. या बिया नातेवाइकांनी आपल्या घराभोवती ओलाव्याच्या ठिकाणी लावाव्यात अशी वधू-वरांची संकल्पना आहे, अशी माहिती देण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZKQBC
Similar Posts
२२ ऑगस्टपासून पुण्यात वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सव पुणे : ‘ नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २५ ऑगस्टदरम्यान वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती संयोजक अनुज खरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
जैवविविधता दिनानिमित्त विविध कार्यक्रम पुणे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, २२ मे २०१९ रोजी ‘हिमालय ड्रग कंपनी’ आणि ‘सोसायटी फॉर एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हार्सिटी कॉन्झर्वेशन (एस. ई. बी. सी) यांच्या संयुक्त विद्यमाने एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन पुणे : ‘रिवा, कल्ला-मोहल्ला आणि अॅडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज
खामकर यांना ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कवी यशवंत स्मृती पुरस्कार या वर्षी ‘भवताल’ या कवितासंग्रहासाठी कवी शांताराम खामकर ऊर्फ श्याम यांना जाहीर झाला आहे. एक हजार रुपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language